Numbers on car tyres: आपल्या वाहनाचे टायर खराब झाले की आपण दमदार टिकावू आणि सुरक्षित टायर खरेदीसाठी गॅरेजमध्ये जातो. अनेक प्रकारचे टायर आपल्या दिसतात. मात्र, त्यातला आपल्या सोईचा आणि टिकावू टायर कुठला? असा प्रश्न आपल्याला पडतो अन् मोटर मेकॅनिक त्याच्या सोईचा अर्थात त्याला परवडणारा टायर तो आपल्याला विकतो. हे सर्व आपल्या अज्ञानामुळे. मात्र, आपण आज टायर खरेदीचं तंत्र एकदा समजून घेतलं की, दुसऱ्यांना तुमची फसगत होणार नाही. चला तर जाणून घेऊया..

टायरवरील ‘हे’ आकडे तुम्ही पाहिलेत का? समजून घ्या

प्रत्येक टायरवर कंपनीकडून काही आकडे दिलेले असतात. खरेतर टायर बदलताना हे आकडे उपयोगी पडतात. टायरचा आकार, प्रकार आणि दर्जाची माहिती त्यात दडलेली असते. यामध्ये प्रत्येक अंकाचा वेगळा अर्थ आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या टायर्ससाठी ही संख्या वेगळी आहे. उदाहरणार्थ, जर टायरवर क्रमांक २२५/५०R१७ ९४V लिहिलेला असेल तर त्याचा अर्थ काय ते सविस्तरपणे समजून घेऊ.

१. वरिल क्रमांकामध्ये प्रथम २२५ लिहिले आहे, याचा अर्थ टायरची रुंदी २२५ मिमी आहे, साइडवॉलवर लिहिलेले पहिले तीन आकडे टायरची रुंदी दर्शवतात.

२. यानंतर, पुढील दोन टायर्सची उंची नमूद केली आहे, म्हणजेच येथे २२५/५० लिहिले आहे, याचा अर्थ टायरच्या साइडवॉलची रुंदी २२५mm च्या ५०% आहे, म्हणजे ती १११.५mm आहे.

(हे ही वाचा: …म्हणूनच तुमची कार चांगल मायलेज देत नाही, फक्त करा ‘हे’ काम, पेट्रोल वरील खर्चात होईल कपात )

३. या संख्यांनंतर, आता टायरवर इंग्रजी वर्णमाला लिहिलेली आहे, जी टायरचे बांधकाम प्रकार दर्शवते. येथे ‘R’ लिहिल्याप्रमाणे, याचा अर्थ हा ‘रेडियल प्लाय’ टायर आहे, जो सामान्य प्रकारचा टायर आहे.

४. रिमचा आकार इंग्रजी वर्णमाला नंतर लिहिलेल्या संख्येद्वारे दर्शविला जातो, जसे की येथे १७ लिहिले आहे, याचा अर्थ हा टायर १७ इंच रिमसाठी बनविला गेला आहे.

५. यानंतर, स्पेसच्या नंतर लिहिलेले पुढील दोन अंक टायर पूर्ण फुगल्यावर त्यावर किती भार टाकू शकतात याची माहिती देतात.

६. टायरवर लिहिलेले शेवटचे अक्षर त्याच्या स्पीड रेटिंगबद्दल माहिती देते, जे टायर किती वेगाने चालवता येईल याची माहिती देते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकारे तुम्हाला तुमच्या वाहनासाठी कुठला टायर सोईचा ठरणार हे तुम्ही वरिल आकड्यांवरून ठरवू शकता. त्याचबरोबर तुमची होणारी फसगत सुध्दा टाळू शकता.