स्वतःकडे चारचाकी गाडी असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. शहर असो किंवा गाव प्रत्येक ठिकाणी स्वतःची गाडी असण्याची गरज भासतेच. परंतु इतर सर्व वस्तूंप्रमाणेच गाड्यांच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. अशात पैशांची जुळवाजुळव करुन कोणती गाडी घेता येईल याचा विचार केला जातो. त्यासाठी कर्ज काढले जाते आणि कार घेण्याचे स्वप्न पुर्ण केले जाते. नंतर गाडीवरचे कर्ज फेडण्यासाठीचे प्रयत्न सुरू होतात. कर्ज फेडण्यासाठी काही सोप्या टिप्स फायदेशीर ठरतात, कोणत्या आहेत त्या टिप्स जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परवडणाऱ्या किंमतीच्या कारची निवड करा
सर्वात उत्तम कार आपल्याकडे असावी असे प्रत्येकालाच वाटते. पण उत्तम कार घेण्याच्या प्रयत्नात खर्चाचे गणित बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते, त्यामुळे जर कर्जाचा ताण अति होऊ नये असे वाटत असेल तर परवडणाऱ्या किंमतीची कार निवडा.

आणखी वाचा: आर्मी टॅंकसारखा लूक, निवडणूक प्रचार अन्…; पवन कल्याण यांची खास गाडी पाहिली का?

एक्स्ट्रा इएमआय पेमेंट करा
कार विकत घेताना तुम्ही जर एक्स्ट्रा इएमआय पेमेंट केली तर कर्जाचा भार कमी होऊ शकतो. त्यामुळे जर शक्य असल्यास सुरूवातीलाचा एक्स्ट्रा इएमआय पेमेंट करा.

शक्य असेल तितकी रक्कम डाउनपेमेंट म्हणून द्या
शक्य असेल तितकी रक्कम जर तुम्ही डाउनपेमेंट म्हणून दिली तर कर्जाची रक्कम कमी होऊन त्यावरील इंटरेस्ट रेट देखील कमी होईल. उदाहरणार्थ जर १० लाख रुपयांची कार असेल आणि तुम्ही अर्धी रक्कम डाउनपेमेंटमध्ये भरली तर तुम्हाला फक्त अर्ध्या रकमेवरील व्याज भरावे लागेल. आणि जर डाउनपेमेंट कमी भरले तर मोठ्या रकमेवरचे व्याज भरावे लागेल.

आणखी वाचा: कारमधील टचस्क्रीनवर स्क्रॅच पडले आहेत का? त्यावर करा हे सोपे उपाय

अधिकचे खर्च टाळा
जेव्हा एखाद्या कर्जाची परतफेड करायची असते तेव्हा खर्चाचे गणित सांभाळणे गरजेचे असते. जर अधिकचे खर्च वाढले तर कर्जाची परतफेड करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे कारचे कर्ज असेल तेव्हा अधिकचे खर्च टाळावे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart tips to pay car loan easily know easy method pns
First published on: 09-12-2022 at 22:00 IST