बाइक सेगमेंटमध्ये मायलेज बाइक्सनंतर स्पोर्ट्स बाईकची मागणी सर्वाधिक आहे. या स्पोर्ट्स बाइक्सच्या वेगवान स्पीड आणि आकर्षक डिझाईनमुळे, तरुणांना खूप आवडते. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगली इंजिन आणि स्पीड असलेली स्पोर्ट्स बाईक घ्यायची असेल, तर तुम्ही या सेगमेंटच्या दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या तुलनेत, आज आमच्याकडे Suzuki Gixxer आणि Yamaha FZS FI V3 बाइक्स आहेत ज्यात आम्ही तुम्हाला त्यांच्या किंमतीपासून ते मायलेजपर्यंतचे संपूर्ण तपशील सांगत आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय खरेदी करू शकाल.

Suzuki Gixxer: सुझुकी जिक्सर कंपनीची सर्वाधिक विकल्या जाणार्‍या बाइक्सच्या यादीत येते. आकर्षक लूक आणि किमतीमुळे पसंत केली जाते. कंपनीने या गाडीचा फक्त एक प्रकार बाजारात आणला आहे. बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास यात १५५ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे फ्यूल इंजेक्टेड एअर कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १३.६ पीएस पॉवर आणि १३.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढच्या चाकामध्ये आणि मागील चाकामध्ये डिस्क ब्रेक्सचे संयोजन दिले आहे. यात सिंगल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम स्थापित केली आहे. मायलेजबद्दल, सुझुकीचा दावा आहे की ही स्पोर्ट्स बाइक ६४ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे.. सुझुकी जिक्सरची सुरुवातीची किंमत १.३१ लाख रुपये आहे.

चार लाखांच्या बजेटमध्ये मजबूत मायलेज देणार्‍या तीन कार, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Yamaha FZS FI V3: यामाहा एफझेडएस एफ व्ही३ ही बाइक आकर्षक लूक आणि वेगासाठी पसंत केली जाते. कंपनीने या बाइकचे दोन व्हेरियंट बाजारात आणले आहेत. बाईकमध्ये १४९ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १२.४ पीएस पॉवर आणि १३.३ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मायलेजबद्दल, यामाहाचा दावा आहे की ही बाईक ४५ किमीचा मायलेज देते. हा मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. बाइकची सुरुवातीची किंमत १.१७ लाख रुपये असून टॉप व्हेरियंटवर १.२० लाख रुपयांपर्यंत जाते.