देशातील कार क्षेत्रात सीएनजी कारच्या पाठोपाठ सर्वाधिक पेट्रोल कारला प्राधान्य दिले जाते. परंतु याशिवाय डिझेल कारला प्राधान्य देणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत. जर तुम्हालाही डिझेल कार आवडत असेल आणि तुम्हाला एक चांगली डिझेल कार खरेदी करायची असेल आणि कमीत कमी बजेटमध्ये असेल तर येथे जाणून घ्या टॉप तीन डिझेल कार ज्या मध्यम श्रेणीत सहज उपलब्ध आहेत.

Tata Altroz: टाटा अल्ट्रोज ​​आपल्या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत येते. भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. कंपनीने या कारचे सात ट्रिम बाजारात आणले आहेत. त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात १४९७ सीसीचे इंजिन दिले आहे. हे १.५ लिटर डिझेल इंजिन ९० पीएस पॉवर आणि २०० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. टाटा अल्ट्रोज​​च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही हॅचबॅक २५.११ किमीचा मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे. टाटा अल्ट्रोज​​च्या डिझेल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ७,४२,९०० रुपये आहे, जी टॉप व्हेरियंटवर १२.०७ लाख रुपयांपर्यंत जाते.

Hyundai Aura: ह्युंदाई ऑरा ही एक स्टायलिश सेडान आहे जी तिच्या डिझाइन, वैशिष्ट्ये आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. कंपनीने या सेडानच्या पाच ट्रिम्स बाजारात आणल्या आहेत. ह्युदाई ऑराच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये ११९७ सीसीचे १.२ लीटर डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन ७५ पीएस पॉवर आणि १७२ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही सेडान २५ किमी मायलेज देते. या सेडानची सुरुवातीची किंमत ७,९६,९०९ रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी टॉप व्हेरियंटमध्ये जाताना १०.७४ लाख रुपयांपर्यंत जाते.

होंडा कारच्या देशांतर्गत विक्रीत घट, एप्रिल २०२२ मधील आकडेवारी जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Honda Amaze: होंडा अमेज कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या लोकप्रिय कारच्या यादीत येते. कंपनीने त्याचे नऊ व्हेरियंट बाजारात लाँच केले आहेत. होंडा अमेजच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यामध्ये १४९८ सीसीचे इंजिन दिले आहे. जे १.५ लिटर डिझेल इंजिन आहे. हे इंजिन १०० पीएस पॉवर आणि २०० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्स देण्यात आला आहे. कारच्या मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही होंडा अमेज २४.७ किमीचा मायलेज देते आणि हा मायलेज ARAI ने प्रमाणित केला आहे. होंडा अमेजच्या डिझेल व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ८,७८,३०० रुपये (एक्स-शोरूम) आहे, जी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये गेल्यावर १३.३८ लाख रुपयांपर्यंत जाते.