Toyota Fortuner Price in Pakistan: जपानची मोटार कंपनी टोयोटाच्या गाड्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यातीलच एक कार म्हणजे Toyota Fortuner आहे. टोयोटा फॉर्च्यूनर एक सुरक्षित कार मानली जाते त्यामुळे या कारची विक्री भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात होत असते. टोयोटा फॉर्च्यूनर एक उत्तम SUV आहे. या कारमध्ये १, २ नाही, तर ७ एअरबॅग येतात. मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय मार्केटमध्ये टोयोटा फॉर्च्यूनर एक दमदार SUV म्हणून ओळखली जातेय. बॉलिवूड सेलिब्रिटी ते नेते टोयोटा फॉर्च्यूनरचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. ही एक चांगली महागडी एसयूव्ही आहे.

टोयोटा फॉर्च्युनरची भारतातील किंमत सुमारे ३३.५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि सुमारे ५१.५ लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. त्याचवेळी शेजारच्या पाकिस्तानात टोयोटा फॉर्च्युनर एवढी महाग झाली आहे की, याचा विचार करूनच तुम्ही डोक्याला हात धराल. आधीच पाकिस्तानचा कार बाजार आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. पाकिस्तानच्या ऑटो मार्केटची स्थिती आता खूपच वाईट झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत कार विक्री अत्यंत कमी झालीये. कारची विक्री होत नसल्याने येथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तर दुसरीकडे कारच्या किमतीही वाढत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान महागाईमुळे चर्चेत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, पाकिस्तानात अनेक वस्तूंचे दर भारतापेक्षा दुप्पट आहेत. पाकिस्तानमध्ये पीठ, तेल, भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले असेल. पण तुम्हाला तिथल्या गाड्यांच्या किमतीबद्दल माहिती आहे का? अनेकांना भारतात फॉर्च्युनरची किंमत खूप जास्त वाटते. पण, जर आपण पाकिस्तानबद्दल बोललो, तर फॉर्च्युनरची किंमत ऐकून तुम्हालाही हुडडुडी भरेल.

(हे ही वाचा : ८ लाखाच्या मारुतीच्या ‘या’ एसयूव्हीनं Nexon, चं वर्चस्व संपवलं! झाली तुफान विक्री, १० लाखांहून अधिक लोकांनी केली खरेदी )

पाकिस्तानमध्ये टोयोटा फॉर्च्युनरची किंमत किती?

पाकिस्तानातील टोयोटा फॉर्च्यूनरचा दर पाहिला तर पाकिस्तानी रुपयानुसार तेथील दर खूप जास्त आहेत. अनेक पाकिस्तानी वेबसाइट्सनुसार, टोयोटा फॉर्च्यूनर पाकिस्तानात सुमारे २ कोटी रुपये (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे. यानंतर, जर कर वगैरे जोडले तर रस्त्यावरील किंमत २ कोटींहून अधिक जाते. तथापि, त्याचे टॉप व्हेरियंट या किमतीत उपलब्ध असेल. Toyota Fortuner GR-S (डिझेल 4×4) ची पाकिस्तानमध्ये एक्स-शोरूम किंमत १.९८ कोटी रुपये आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फक्त टोयोटा फॉर्च्युनर पाकिस्तानमध्ये महाग नाही. त्याचवेळी सर्वच वाहनांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वास्तविक पाकिस्तान आर्थिक संकटातून जात आहे. महागाई वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवणे देशाला शक्य नाही. याचा मोठा परिणाम वाहन उद्योगावर झाला आहे. वाहनांच्या किमती वाढल्या असून विक्री कमी झाली आहे. परिस्थिती अशी आहे की पाकिस्तानमध्ये दर महिन्याला केवळ काही हजार कार विकल्या जातात.