scorecardresearch

Premium

४५ हजाराच्या TVS च्या ‘या’ बाईकसमोर सर्व पडतात का फेल? एक लीटर पेट्रोलमध्ये धावते ८० किमी

जर तुम्ही कमी किंमतीत बेस्ट मायलेजच्या बाइकच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती देत आहोत.

TVS XL100 Bike
80 kmpl मायलेज आणि दमदार फीचर्स (Photo-financialexpress)

गाव असो वा शहर, श्रीमंत असो की गरीब, लोकं गर्दीच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी सहसा दुचाकी वाहनांचा वापर करतात. हल्ली मोठ्या संख्येने लोक दुचाकीचा वापर करतात. पैसे वाचवण्यासाठी लोक आता सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईकचे पर्याय तपासत आहेत. आज आपण एका अशा बाईकबद्दल बोलणार आहोत, जी उत्कृष्ट मायलेज तर देतेच परंतु अनेक वर्षांपासून तिने भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. तुम्ही नवीन बाईक घेण्याचा विचार करत आहात? मात्र तुम्हाला जास्त खर्चही नकोय आणि जास्त मायलेज हवंय, अशी तुमची इच्छा असेल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

मायलेज असावं तर असं

आज आम्ही ज्या बाईकबद्दल बोलत आहोत त्या बाईकचे नाव TVS XL100 आहे. खरं तर, TVS XL 100 ही मोपेड सारखी दिसणारी आहे, परंतु शहरी सवारीसाठी ही एक उत्कृष्ट आणि किफायतशीर राइड आहे. शिवाय, तुम्ही त्यात सामान लोड करू शकता आणि सहज वाहून नेऊ शकता.

shocking video goes viral
VIDEO : पिंजऱ्याची कडी काढून महिलेच्या अंगावर धावले माकड, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Kia Carens X-Line launched
बाकी कंपन्यांची उडाली झोप, Kia ची सात सीटर कार नव्या अवतारात देशात दाखल, मायलेज २४ किमी, किंमत…
Blood Cancer Awareness Month 2023 Early signs and symptoms you must watch out for Lukemia Limphoma Look Out For Change
Blood Cancer: रक्ताच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे व चिन्हे ओळखा; ‘या’ लोकांना असतो सर्वाधिक धोका
Gas Lighter Jugaad Video
महिलेच्या केसांना कर्ल करण्यासाठी तरुणाने केला अनोखा जुगाड, गॅस लायटरचा ‘असा’ केला वापर, Video पाहून थक्क व्हाल

(हे ही वाचा : ५.९९ लाखाच्या ६ एअरबॅग्सवाल्या सर्वात लहान अन् सुरक्षित SUV वर अख्खा देश फिदा, Punch ही पडतेय फिकी? )

फीचर्स , इंजिन आणि मायलेज

TVS XL 100 मध्ये कंपनी तुम्हाला ९९.७ cc पेट्रोल इंजिन देते. हे इंजिन ४.४ बीएचपी पॉवर जनरेट करते. त्याचा टॉर्क सुमारे ६.५ Nm आहे. त्याच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर, ते खूपच हलके आहे आणि कर्बचे वजन ८९ किलो आहे. त्याचवेळी, त्याचे मायलेज कोणत्याही मोटरसायकलपेक्षा जास्त आहे. हे तुम्हाला प्रति लिटर पेट्रोलवर ८० किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देते. बाईकमध्ये किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

किंमतही कमी

TVS XL 100 तुम्हाला ६ प्रकारांमध्ये ऑफर करण्यात आला आहे. तर त्याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला बाईकचा टॉप व्हेरिएंट ५९,६९५ च्या एक्स-शोरूम किमतीत मिळेल. बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त बाइक्सपैकी ही एक आहे. TVS XL100 आता एकूण पाच रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tvs xl100 is now available in a total of five colour options it is available in india in 6 variants pdb

First published on: 20-09-2023 at 16:00 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×