देशात मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअ‍ॅप हे मॅसेजिंग अ‍ॅप वापरले जाते. नुकतंच व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट पर्याय सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर आता उबेर आणि व्हॉट्सअ‍ॅपने भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. उबेरने व्हॉट्सअ‍ॅपशी करार केला आहे. त्यामुळे ग्राहक आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून उबेर कॅब बुक करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस प्लॅटफॉर्मवर हे फिचर तयार करण्यात आला आहे. उबेर प्रायोगिक तत्त्वावर लखनऊमध्ये अमलबजावणी करणार आहे. त्यानंतर इतर शहरांमध्ये विस्तार केला जाणार आहे. या फिचरच्या माध्यमातून ग्राहक उबेर कार, उबेर मोटो आणि ऑटो बुक करू शकतील. गाडी बुक करण्याचा पर्याय व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार असल्याने उबेर अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. कॅब बुक केल्यापासून इच्छित ठिकाणी जाईपर्यंतच्या सर्व क्रिया व्हॉट्सअ‍ॅपमधून पार पडणार आहेत. सध्या राइड बुक करण्याचा पर्याय फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. इतर भाषांमध्येही लवकरच हा पर्याय मिळणार आहे.

उबेर गाडी बुक करण्याची सुविधा नविन आणि वापरात असलेल्या दोन्ही युजर्संना मिळेल. उबेर अ‍ॅपवर मिळणाऱ्या सर्व सुविधा इथेही मिळणार आहे. ड्रायव्हरचे नाव, नंबर प्लेट अशा सर्व बाबी इथेही दिसणार आहेत.

भारतात टेस्ला कंपनीचे सुपरचार्जर बसवण्यास सुरूवात!; इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी

व्हॉट्सअ‍ॅपवरून उबेर गाडी कशी बुक कराल?

  • उबेर बिझनेस अकॉउंटवर मॅसेज पाठवू शकता
  • क्यूआर कोड स्कॅन करू शकता
  • उबेर व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या थेट लिंकवर क्लिक करू शकता

Nexzu Roadlark इलेक्ट्रिक सायकल १०० किमी रेंजसह भारतात दाखल; जाणून घ्या वैशिष्ट्य

“आम्ही सर्व भारतीयांना उबेर ट्रिप सोपं करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. व्हॉट्ससोबतच्या करारामुळे गाडी बुक करण्यापासून इच्छित स्थळापर्यंत जाणं आणखी सोपं होणार आहे.”, असं उबेर अपॅकच्या व्यवसाय संचालक नंदिनी माहेश्वारी यांनी सांगितलं. “व्यवसायिकांना त्यांच्या ग्राहकांशी थेट संपर्क साधणं व्हॉट्सअॅपवर सोपं होतं.”, असं व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांनी सांगितलं.