Rubber Hairs On Tyre: आपण दररोज दुचाकी, कार, बस, ट्रक, टॅम्पो यांसारखे वाहन आपल्या आजुबाजूला पाहत असतो. पण कधी तुम्ही या वाहनांच्या टायरकडे बारकाईने लक्ष दिले आहे का? तुम्ही या टायरवरती रबराचे छोटे काटे पाहिलेच असेल, हे रबराचे छोटे काटे वाहनांच्या टायरवर का असतात, हे तुम्हाला माहिती आहे का? कधी तुम्ही याचा विचार केलाय का? या काट्यांचं नेमकं कार्य तरी काय आहे, हे काटे टायरवरती का असतात. चला तर मग जाणून घेऊया.

गाडीच्या टायरवरील रबराच्या काट्याचे काय असते काम ?

टायरवरच्या रबरावर काटे का असतात, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, टायरवरती असलेल्या या काटेदार रबर हेअरला Vent Spews असं म्हणतात. जे टायरच्या वर बाहेर निघालले असतात. हे Vent Spews टायरची गुणवत्ता दाखवतात. ज्या टायरवर रबर हेअर असतात ते चांगल्या क्वालिटीची मानले जातात. जेव्हा गाडी रस्त्यावर चालते तेव्हा यावेळी टायरवर दबाव पडतो. हाच दबाव कमी करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग दरम्यान रबर हेअर लावले जातात.

(हे ही वाचा : Tyre Tips: कार-बाईक चालवताय, रस्त्यावर सुसाट धावणार तुमची वाहने, ‘या’ टायर्सबद्दल माहितेय का? वाचा सविस्तर )

तसेच, टायर बनवण्याच्या प्रक्रियेदरम्यान टायरमध्ये रबर इंजेक्ट केले जातात. ते टायरवरच तयार होते. टायर बनवण्याच्या प्रक्रियेत, वितळलेले रबर मोल्डमध्ये इंजेक्ट केले जाते, ज्यामध्ये हवा थांबू नये म्हणून व्हेंट्स दिले जातात. त्यासोबतच रबर इंजेक्ट करण्यासाठी हीट आणि हवा दोन्हींचाही वापर करण्यादरम्यान टायरमध्ये बुडबुडे तयार होण्याची भीती असते. अशात Vent Spews हा धोका कमी करण्याचं काम करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोणता टायर विकत घेणे फायद्याचे?

जर तुम्ही टायर विकत घेताना त्याला असे काटे दिसले किंवा असे जास्त खाच असलेले डिझाइन दिसले, तर समजा की तुमचा टायर दर्जेदार आहे. त्यामुळे पुढच्या वेळी टायर विकत घेताना असा काटे असलेला टायर विकत घ्या, तो तुमच्यासाठी फायद्याचे देखील ठरेल.