Ethanol Fueled Car: देशात पेट्रोल-डिझेलला पर्याय देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार खास प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार दाखल केली आहे. ‘टोयोटो इनोव्हा हायक्रॉस’ असं या गाडीचं नाव आहे. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल (Electrified Flex fuel Car) कार आहे. BS6 स्टेज-२ मानांकनानुसार, याची निर्मिती करण्यात आली आहे. आता देशातील रस्त्यावर पहिल्यांदाच शंभरी टक्के इथेनॉलवर कार धावतेय. त्यानंतर भारतभर या पर्यायी इंधनाविषयी उत्सुकता ताणल्या गेली आहे. खरंतर देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल कार देशात लाँच करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात सध्या ई-२० लागू आहे, म्हणजेच २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल. इथेनॉलच्या वापरातून गाडी चालविण्याचा हा पहिला व्यावहारिक प्रयोग क्रांतिकारी म्हणावा लागेल. नितीन गडकरी यांनी येत्या काही महिन्यांत देशात शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या धावतील, अशी घोषणा अलीकडेच केली. यासाठी विविध कंपन्यांशी बोलणे सुरू असून लवकरच काही तांत्रिक बदल करून पूर्णपणे इथेनॉलवर धावणाऱ्या गाड्यांचे युग अवतरेल, असे त्यांनी म्हटले आहे. या घोषणेची बरीच चर्चा होत आहे. लहान-सहान गाड्यांसाठी कोणत्याही अन्य मिश्रणाशिवाय थेटपणे वापरण्यात येणारे इथेनॉल हे पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमधील इंधनासाठी खात्रीशीर पर्याय म्हणून पाहिले जात आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds first flex fuel ethanol powered car unveiled in india by nitin gadkari benefits of car running 100 percent on ethanol ltdc pdb
First published on: 08-01-2024 at 10:18 IST