शेखर जोशी

डोंबिवलीकर सुजाण नागरिक, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन या सर्वांना नमस्कार. गेल्या काही वर्षांपासून मी डोंबिवली पूर्व टिळकनगर भागात उभा आहे. पूर्वी हा भाग ‘पारसमणी चौक’ म्हणून ओळखला जात होता. आता माझा पूर्णाकृती पुतळा इथे उभा राहिल्यापासून ‘टिळक पुतळा चौक’ ( Lokmanya Tilak ) किंवा परिसर म्हणून तो ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून या जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी मला येथून हलविण्यात आले आहे. आज माझी जयंती. किमान आजच्या दिवशी तरी मी माझ्या हक्काच्या जागेवर पुन्हा उभा राहीन, अशी अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही.

Kelzar, Leopard died Wardha, Leopard latest news,
वर्धा : प्रजननकाळच बिबट्यांच्या जीवावर उठतोय, जंगल सोडून रस्त्यावर येतात, आणि….
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
The Neighbour before the House films by CAMP
कलाकारण : कुठून कुठे जाणार हे इस्रायली?
Leaders do not come to ask for votes banners at Pangul Colony in Nagpur
नेत्यांनो, मत मागायला येऊ नका! नागपुरातील पांगूळ वसाहतीत फलक
Nagpur 63 tall building around airport
धोकादायक! नागपूर विमानतळाला ६३ उंच इमारतींचा विळखा…
How Pune’s Nagarkar Wada withstood a century yet faces neglect today
Nagarkar Wada : पुण्यातल्या नगरकर वाड्याची शंभरी, कधीकाळी दिमाख पाहिलेल्या वास्तूची अवकळा, ‘पुढे धोका आहे!’ चा फलक वेधतोय लक्ष
From BJP Devendra Fadnavis has been nominated for sixth time and Chandrashekhar Bawankule for fourth time
नागपूर : फडणवीस सहाव्यांदा; बावनकुळे, खोपडे चौथ्यांदा अन्…
mva seat sharing formula news marathi
मविआचं अखेर ठरलं! जागावाटपाबाबत नाना पटोलेंनी जाहीर केला मुहूर्त; म्हणाले, “आम्ही तिघं…”

लोकमान्य टिळक जयंती असूनही पुतळा जागेवर नाही

Lokmanya Tilak माझ्या जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी माझी आठवण काढली जायचीच. पण डोंबिवलीत होणारी नववर्ष स्वागत यात्रा, टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणपती आगमन, विसर्जन मिरवणूक आणि इतर महत्त्वाचे सण, उत्सव यावेळीही माझी आठवण काढली जायची. डोंबिवलीतील राष्ट्रपुरुष स्मृती जागरण समितीचे सदस्यही दरवर्षी जयंती, पुण्यतिथीच्या दिवशी माझ्यापाशी यायचे. तिथे जमून माझी आठवण काढायचे. यावर्षी ती सर्व ज्येष्ठ मंडळी इथे आली नाहीत. बरोबर आहे, मीच इथे नाही तर ते येऊन तरी काय करणार?

एका पुतळ्याचं मनोगत वाचा

शासकीय किंवा महापालिका पातळीवर कोणतेही मोठे काम, प्रकल्प हाती घेतला की त्या ठिकाणी प्रकल्पाचे काम करणारी व्यक्ती/कंपनीच्या नावाचा फलक लावला जातो. त्या कामाचा खर्च किती आहे? काम कधी पूर्ण होणार? जे नियोजित काम उभे केले जाणार आहे, त्याचे चित्र अशी सर्व माहिती त्या जागेवर सर्वांना ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने लावली जाणे अपेक्षित असते आणि मलाही ( Lokmanya Tilak ) ते अपेक्षित होते. पण ही साधी अपेक्षाही पूर्ण झाली नाही.

मला कुठे हलविण्यात आले? कुठे ठेवले आहे? किमान ही माहिती तरी सर्वसामान्य लोकांना कळायला हवी होती. पण तसेही काही मला दिसले नाही. आपल्या डोंबिवलीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, राजकारणी, महापालिका प्रशासनातील अधिकारी इतर महत्त्वाच्या कामात गुंतले असतील आणि त्यामुळे माझी विचारपूस करायला, माझ्या हक्काच्या जागेवर मी पुन्हा कधी उभा राहणार? याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळाला नसेल. असो.

हे पण वाचा- १२ वी पास उमेदवारांना मुंबईत नोकरीची संधी! BMC लोकमान्य टिळक रुग्णालयांतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, महिना २५ हजार पगार मिळणार

( Lokmanya Tilak ) माझ्या समोरच असलेल्या रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की काही बोलायची सोय नाही. आता माझा अज्ञातवास कधी संपतोय, याची मी ही वाट पाहतोय. सध्या माझ्या अवतीभोवती बांबू, प्लास्टिकचा काळा आणि हिरव्या रंगाचा कापडी पडदा लावून मला बंदिस्त केले आहे. माझ्या येत्या पुण्यतिथीपर्यंत ( १ ऑगस्ट) तरी माझी हक्काची जागा मला मिळेल का? वाट पाहतोय…

शेखर जोशी