scorecardresearch

Union Budget 2023 : अर्थसंकल्पावर शिवसेनेच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले “त्यांना एकच आकडा समजतो तो…”

“विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं, की …” असं म्हणत विरोधकांच्या टीकेला दिलं आहे प्रत्युत्तर.

Union Budget 2023-24, Devndra Fadnvis
केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ (फोटो-ट्वीटर व्हिडीओ )

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पातून सरकार गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय, व्यावसायिक इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मोदी सरकार काय देणार, याची सर्वांना उत्सुकता होती. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून यावर टीका सुरू आहे, तर सत्ताधाऱ्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत विरोधकांनी अर्थसंकल्पावर आणि केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

Union Budget 2023 Live Updates: अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासीयांना आवाहन, म्हणाले…!

किसान योजनेच्या अंतर्गत ११ लाखांचे आकडे केंद्र सरकारने सांगितले होते, ते खोटे आहेत असा आरोप शिवसेना(ठाकरे गट) खासदारांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की केवळ तीन लाख शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळालेला आहे. यावर फडणवीसांनी उत्तर देताना म्हटले की, “हे जे महाभाग तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलत आहात, शिवसेनेचे खासदार त्यांना आकडे माहीत नाही, त्यांना एकच आकडा समजतो तो कोणता आकडा आहे हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. त्यांना तोच आकडा समजतो. मूळ रूपात शेतकऱ्यांना आपण जो पैसा देतो, तो डीबीटीद्वारे देतो. डीबीटीमध्ये आकड्यांची हेरफेरच होऊ शकत नाही.”

हेही वाचा – Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

याशिवाय, “११ कोटी शेतकऱ्यांना हे मिळतात, एकट्या महाराष्ट्रात एक कोटी शेतकऱ्यांना मिळतात. त्यांचे सरकार होते तेव्हाही एक कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात हा पैसा मिळाला. याची पुष्टी त्यांच्याच सरकारने केली आहे. त्यामुळे अशा आकडेबाज लोकांबाबत मला विचारू नका.” असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

याचबरोबर, “विरोधकांनी सकाळीच हे ठरवलं होतं, की कसंही बजेट आलं तरी काय प्रतिक्रिया द्यायची. सकाळीच लिहून ठेवलं होतं. तीच स्क्रीप्ट ते वाचत आहेत. त्यांनी बजेट बघितलंही नाही, त्याचा अभ्यासही केला नाही. बजेटच्या मेरीटवरही ते बोलत नाहीत. कारण, मेरीट त्यांना पाहायचेच नाहीत. त्यांनी सकाळी जी प्रतिक्रिया ठरवली तीच प्रतिक्रिया त्यांना ऐकवायची आहे. म्हणून त्यांच्या प्रतिक्रियेवर मी प्रतिक्रिया द्यावी, एवढा त्या प्रतिक्रियेत दमच नाही.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.

विश्लेषण: अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी नेमकं काय? करपात्र उत्पन्नाची मर्यादा बदलली, पण त्याचा फायदा कुणाला होणार?

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली टीका, म्हणाले… –

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या पदरी घोर निराशा आली आहे. तसेच भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलिअन करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी कोणतंही विधान केलं नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केंद्रीय अर्थसंकल्पातून करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करताना शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट करण्याचं यापूर्वी सूचित केलं होतं. शेतकऱ्यांच्या दुप्पट झालेल्या उत्पन्नाला योग्य तो बाजारभाव देण्यासाठी ठोस उपाय योजना करायला हवी होती, ती केली गेली नाही.” अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

मराठीतील सर्व Budget 2023 ( Budget ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 15:19 IST