केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार २.० चा हा अखरेचा अर्थसंकल्प होता. कारण, २०२४ साली देशात लोकसभेच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वाचं लक्ष लागून होतं. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केली आहे. ७ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी केली.

यावेळी सीतारमण यांनी कर्ज, करात सवलत, शेतकरी, व्यावसायिक, महागाई अशा महत्वाच्या क्षेत्रांविषयी घोषणा केल्या आहेत. तसेच, अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त होणार याबद्दलही अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री चुकल्या, नितीन गडकरींसह सर्वांनाच हसू अनावर, निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सॉरी…”

काय स्वस्त होणार

  • काही स्मार्टफोन, कॅमेराचे लेन्स स्वस्त झाले,
  • इलेक्ट्रिक वाहने
  • एलईडी टिव्ही, बायोगॅस संबंधी गोष्टी
  • खेळणी
  • सायकल
  • अ‍ॅटोमोबाईल

हेही वाचा : “डायमंड हब सुरतला दिलं, अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारने स्मार्टफोनवरील सीमा शुक्लात कपात केली आहे. तसेच, स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणाऱ्या लिथियम बॅटरीच्या सीमा शुल्कातही कपात करण्यात आली आहे. स्मार्टफोनमधील कॅमेरा लेंसच्या सीमा शुक्लात २.५ टक्क्यांनी कपात केली. तसेच, एलईडी टीव्हीच्या सीमा शुक्लातही २.५ टक्क्यांनी कपात करण्यात आल्याचं सीतारमण यांनी सांगितलं.