Bank Holidays List May 2025 :  मे महिन्यात शाळा, कॉलेजला सुट्या असल्याने अनेक जण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशा वेळी सुट्यांचे नियोजन पाहतात. तर काही जण आर्थिक नियोजनात गुंतलेले असतात. त्यांना बँकेसंबंधित महत्त्वाची कामं करायची असतात. जर तुमचेही मे महिन्यात बँकेसंबंधित काही महत्त्वाचे काम असेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. कारण- मे महिन्यामध्ये देशभरातील बँका एकूण १२ दिवस बंद राहतील. त्यामध्ये राष्ट्रीय सुट्या, प्रादेशिक सण आणि दुसरा-चौथा शनिवार व रविवार या नेहमीच्या आठवड्याच्या सुट्यांचाही समावेश असेल.

मे महिन्यात कोणत्या दिवशी, कुठे व कोणत्या कारणांसाठी बँका बंद राहतील? ते यादी पाहून जाणून घेऊ…

मे महिन्यातील बँक सुटट्यांची यादी ( May 2025 Bank Holiday List)

१) १ मे २०२५ (गुरुवार)

कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. त्यात बिहार, गोवा, मणिपूर, गुजरात, केरळ, त्रिपुरा, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, जम्मू – काश्मीर, पश्चिम बंगाल व आसाम या राज्यांचा समावेश असेल.

२) ४ मे २०२५ (रविवार)

साप्ताहिक सुटीमुळे देशभरातील बँका बंद राहतील.

३) ९ मे २०२५ ( शुक्रवार)

रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त पश्चिम बंगाल, त्रिपुरा, जम्मू- काश्मीर व दिल्ली.

४) १० मे २०२५ (शनिवार)

महिन्याचा दुसऱ्या शनिवारनमित्त बँकांना सुट्टी असेल.

५) ११ मे २०२५ (रविवार)

रविवार साप्ताहिक सुटीनिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.

६) १२ मे २०२४ (सोमवार)

बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशातल्या अनेक राज्यांतील बँका बंद राहतील. गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मिझोराम, मणिपूर, उत्तराखंड, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश व तमिळनाडूमध्ये बँका बंद राहतील.

७) १६ मे २०२५ (शुक्रवार)

सिक्कीम राज्य दिन असून, फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.

८) १८ मे २०२५ (रविवार)

रविवारच्या साप्ताहिक सुटीनिमित्त देशभरात बँका बंद राहतील.

९) २४ मे २०२५ ( शनिवार)

चौथ्या शनिवारनिमित्त देशभरातील बँका बंद राहतील.

१०) २५ मे २०२५ (रविवार)

रविवार साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने देशभरातील बँका बंद राहतील.

११) २६ मे २०२५ (सोमवार)

काझी नजरुल इस्लाम जयंती असल्याने त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.

१२) २९ मे २०२५ (गुरुवार)

महाराणा प्रताप जयंती असल्याने हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाणामध्ये बँका बंद राहतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१३) ३० मे २०२५ (शुक्रवार)

श्री गुरू अर्जुन देव यांचा शहीद दिवस असल्याने देशातील काही राज्यांमध्ये बँका बंद राहतील.