Diwali Bonus 2023 : मोदी सरकारने दिवाळीनिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारने मंगळवारी (१७ सप्टेंबर) दिवाळी बोनस जाहीर केलाय. या अंतर्गत ग्रुप बी आणि ग्रुप सी श्रेणीतील कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराच्या बरोबरीने पैसे मिळणार आहेत.

अर्थ मंत्रालयाने दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नॉन प्रोडक्टिविटी लिंक्ड बोनस (Ad-Hoc Bonus) देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी अंतर्गत येणारे अराजपत्रित कर्मचारी (Non Gazetted Employee) जे कोणत्याही उत्पादकता लिंक्ड बोनस योजनेंतर्गत समाविष्ट नाहीत, त्यांना हा बोनस दिला जाणार आहे.

हेही वाचाः डाबर इंडियाला ३२१ कोटींच्या जीएसटी थकबाकीची मिळाली नोटीस

मंत्रालयाने मंगळवारी (१७ ऑक्टोबर) सांगितले की, २०२२-२३ साठी केंद्र सरकारच्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी ७ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (Ad-Hoc Bonus) चा लाभ उपलब्ध होणार आहे, असे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने सांगितले. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबरला आहे. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाच्या निवेदनानुसार, हा बोनस त्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे, जे ३१ मार्च २०२३ पर्यंत सेवेत आहेत आणि २०२२-२३ या वर्षात किमान ६ महिने काम केले आहे.

हेही वाचाः कर्जाशी संबंधित मोठा नियम बदलणार अन् कर्जदारांना थेट फायदा मिळणार, मनमानी केल्यास बँकेला ग्राहकांना द्यावे लागणार ‘इतके’ रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी महागाई भत्त्याची घोषणा होण्याची शक्यता

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी कॅबिनेट केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यातही वाढ करू शकते. महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढून ४६ टक्के होण्याची शक्यता आहे. बुधवारी (१८ ऑक्टोबर) सकाळी १०.३० वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत महागाई भत्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.