टाटा ग्रुप तुमच्या ताटात मिठापासून मसाल्यापर्यंत ते चहापासून कॉफीपर्यंत सर्व काही देतो. नाश्त्यासाठी तृणधान्ये, शिजवण्यासाठी तयार पदार्थ आणि अगदी कडधान्ये हे सगळं टाटाच्या ‘फूड फॅमिली’चा भाग आहे. आता त्यात तुम्हाला चायनीज फूडची चव मिळणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये ‘मॅगी नूडल्स’लाही टक्कर मिळणार आहे. खरं तर टाटा समूह दोन फूड कंपन्यांच्या अधिग्रहणासाठी करार करण्याच्या जवळपास पोहोचला आहे. यातील एक कंपनी कॅपिटल फूड्स आणि दुसरी ऑरगॅनिक इंडिया आहे. कॅपिटल फूड्स हे ‘चिंग्स चायनीज’ आणि ‘स्मिथ अँड जोन्स’ यांसारख्या ब्रँडचे मालक आहेत. त्यामुळे ऑरगॅनिक इंडिया ग्रीन टीसारखी इतर उत्पादने विकते. फॅब इंडियाने यामध्ये गुंतवणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः Nifty At Alltime High: निफ्टीनं रचला तेजीचा नवा विक्रम, ऐतिहासिक उच्चांक गाठला, आयटी कंपन्यांचे शेअर्स वधारले

हा करार अनेक कोटींचा असणार

टाटा समूहाची कंपनी ‘टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’ आपल्या गुंतवणूकदारांकडून कॅपिटल फूड्समधील ७५ टक्के हिस्सा खरेदी करत आहे. कॅपिटल फूड्सचे संस्थापक चेअरमन अजय गुप्ता त्यात त्यांचा २५ टक्के हिस्सा राखतील. कंपनीचे मूल्यांकन ५१०० कोटी रुपये आहे, त्यामुळे हा करार ३८२५ कोटी रुपयांमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे टाटा समूहही ऑरगॅनिक इंडियामधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करणार आहे. या करारासाठी ऑरगॅनिक इंडियाचे मूल्य १८०० कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. टाटा समूह पुढील आठवड्यात या दोन्ही करारांबाबत अधिकृत घोषणा करू शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणत्याही कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा: ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या IPO ला जोरदार प्रतिसाद , ३८.४३ पट मागणी, ‘या’ तारखेला होणार शेअर बाजारात ‘लिस्ट’

‘मॅगी’ला देणार स्पर्धा

कॅपिटल फूड्सच्या अधिग्रहणानंतर टाटा समूह इन्स्टंट नूडल्स मार्केटमध्ये प्रवेश करेल. ‘स्मिथ अँड जोन्स’ च्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये ‘आले-लसूण पेस्ट’, ‘केच-अप’ आणि ‘इन्स्टंट नूडल्स’ समाविष्ट आहेत. यामुळे टाटा बाजारात नेस्लेच्या ‘मॅगी’ ब्रँडशी स्पर्धा करेल. ‘मॅगी’चा बाजारात ६० टक्के हिस्सा आहे. तर येप्पी, टॉप रामेन, वाई-वाई आणि पतंजली हे या विभागातील मोठे खेळाडू आहेत. ही बाजारपेठ सुमारे पाच हजार कोटी रुपयांची आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now the tata group will directly compete with nestle maggi will buy capital foods company vrd
First published on: 12-01-2024 at 14:02 IST