रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गेल्या काही महिन्यांपासून दावा न केलेल्या ठेवींचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात आता लोकांच्या सोयीसाठी RBI ने आतापर्यंत UDGAM (Unclaimed Deposits – Gateway to Access information) पोर्टलवर ३० बँकांचा समावेश केला आहे, जेणेकरुन लोकांना दावा केलेल्या आणि हक्क न केलेल्या ठेवी शोधण्यात मदत होणार आहे.

UDGAM पोर्टल ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आले

RBI ने १७ ऑगस्ट रोजी UDGAM पोर्टल लाँच केले होते, जेणेकरून लोकांना त्यांची हक्क नसलेली ठेव रक्कम एकाच ठिकाणी शोधता येणार आहे. हे पोर्टल सुरू करताना सात बँकांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय १५ ऑक्टोबरपर्यंत टप्प्याटप्प्याने आणखी बँकांचा त्यात समावेश करण्यात येणार आहे. एक प्रेस रिलीज जारी करत RBI ने म्हटले आहे की, २८ सप्टेंबर २०२३ पासून पोर्टलवर ३० बँकांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्या मूल्याच्या दृष्टीने ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता (DEA) निधीमध्ये समाविष्ट आहेत. दावा न केलेल्या ठेवींच्या ९० टक्क्यांपर्यंत रक्कम कव्हर केली जाते.

Pregnant Woman, Injured by Falling Stone, Nerul, police register fir, Blasting Work Halted, navi mumbai news, marathi news, blasting for construction site, nerul construction site, construction site, builder construction site, nerul railway station west,
स्फोटप्रकरणी विकासकावर गुन्हा; नेरुळमधील स्फोटांचे काम बंद, नगररचना विभागाची विकासकाला कारणे दाखवा नोटीस
Mehul Prajapati Canada
वर्षाला ८१ लाख रुपये पगार, तरीही मोफत अन्नावर मारायचा ताव; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नोकरी गमावली
Pune Police Big Decision On Transgender
पुणे: ट्रॅफिक सिग्नलवर बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिस करणार कारवाई
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video

हेही वाचाः व्हेज थाळी १७ टक्क्यांनी झाली स्वस्त, CRISIL ने सांगितले ‘हे’ कारण

सर्व प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांची नावे समाविष्ट

आरबीआयने सांगितले की, या पोर्टलवर आतापर्यंत सर्व प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांची नावे समाविष्ट आहेत. या ३० बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील सर्व प्रमुख बँका जसे की, SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया आणि Citibank, Standard Chartered आणि HSBC सारख्या विदेशी बँकांचा समावेश आहे. खासगी क्षेत्रातील बँकांच्या यादीत HDFC बँक, ICICI बँक आणि Axis बँक यांची नावे समाविष्ट आहेत.

हेही वाचाः Money Mantra : युनिकॉर्न व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे स्टार्टअप, जाणून घ्या ‘हेक्टोकॉर्न’ म्हणजे काय?

दावा न केलेली ठेव किती आहे?

आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२३ पर्यंत १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत नसलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे सुमारे ३५,००० कोटी रुपये दावा न केलेल्या ठेवी आरबीआयकडे हस्तांतरित केल्या गेल्यात. SBI मधील सर्वाधिक हक्क न ठेवलेल्या ठेवी ८,०८६ कोटी रुपये आहेत. यानंतर पीएनबी ५,३४० कोटी, कॅनरा बँक ४,५५८ कोटी, बँक ऑफ बडोदा ३,९०४ कोटी आहे.