News Flash

बी.पी.ओ. : अल्पावधीत प्रगती साधा!

बीपीओ कंपन्यांमधून दरवर्षी अंदाजे २५ टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी प्राप्त होतात. हे सहज शक्य आहे, कारण या क्षेत्रातील वार्षकि उलाढाल सरासरी शंभर टक्क्यांनी वाढते

| February 25, 2013 01:27 am

बीपीओ कंपन्यांमधून दरवर्षी अंदाजे २५ टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी  प्राप्त होतात. हे सहज शक्य आहे, कारण या क्षेत्रातील वार्षकि उलाढाल सरासरी शंभर टक्क्यांनी वाढते आहे.
पल्लब रॉय – एका बीपीओतील प्रोग्राम मॅनेजर, वय  तिशीच्या आत, पाच वर्षांच्या कारकिर्दीत १० बढत्या संपादन केलेला व्यवस्थापक. त्याच्या प्रगतीचा चढता आलेख पाहताना लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे त्याला हे सर्व मिळवणे अशा क्षेत्रात शक्य झाले, जिथे वर्षांकाठी कामगारांच्या संख्येत ४० ते ४५ टक्केइतकी घट होत असते. हे क्षेत्र म्हणजे ‘बीपीओ’ अर्थात बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिग.
बी.पी.ओ. क्षेत्रातील कामाच्या अनियमित वेळा, कामातील ताणतणाव ही या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची प्रमुख कारणे आहेत. खरे तर बीपीओ क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये नेहमीच सुरुवातीपासूनच भरपूर वेतन दिले जाते (वर्षांकाठी साधारणत: दोन लाख). तरीही या क्षेत्राकडे ‘अल्पावधीचा करिअर पर्याय’ म्हणून पाहण्याचा युवावर्गाचा कल दिसून येतो. बीपीओत काम करणारे बहुसंख्य कर्मचारी या उद्योगाकडे ‘मौजेखातर काम’ अशा काहीशा सौम्य दृष्टिकोनातून पाहत असल्यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीची धरसोड करण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.
मात्र अलीकडच्या काळात हे चित्र झपाटय़ाने बदलताना दिसत आहे. बीपीओ कंपन्यांमधील कामाचे दर वाढल्याने एकंदरीतच या उद्योगाची आíथक स्थिती सुधारली आहे. अशा वेळेस कर्मचाऱ्यांची होत असलेली घट या उद्योगातील जाणकारांना अस्वस्थ करते. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नोकरीची धरसोडवृत्ती कमी होण्याच्या दृष्टीने बीपीओ कंपन्या पावले उचलत असून या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
या क्षेत्रात वरिष्ठ पदांवर पाच ते सहा वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीला वर्षांकाठी साधारण सहा लाखापर्यंत प्राप्ती होऊ शकते. एवढेच नव्हे तर या क्षेत्रातील कामाचे स्वरूपही आव्हानात्मक
असते. इथल्या कर्मचाऱ्यांच्या मोठय़ा समूहाचे नेतृत्व करण्याची
संधी मिळते.
गेल्या पाच-सहा वर्षांपासून अननुभवी अशा फ्रेश ग्रॅज्युएट्सनाही बीपीओ कंपन्यांमधील कामांसाठी वाढती मागणी आहे. पदवी
प्राप्त असेल आणि अंगी उत्तम संवादाचे कसब असेल तर
वर्षभराच्या बीपीओ क्षेत्रातील नोकरीत दोन लाखापर्यंत सहज कमाई होऊ शकते. याशिवाय घरपोच नेण्या-आणण्याची सोय, उत्तम खाद्यसेवा पुरवणारे कॅफेटेरिया, कामाच्या ठिकाणचे प्रसन्न वातावरण या गोष्टीही कामासाठी पूरक ठरतात. मात्र, वरकरणी या गोष्टी आकर्षक वाटत असल्या तरी, ‘बीपीओ’तील काम म्हणजे नुसतीच मजा आणि
आराम नव्हे.
बीपीओ कंपन्यांमध्ये, मुख्यत्वे कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना, प्रदीर्घ शिफ्ट्समध्ये काम करताना वातावरणातील एकसुरीपणाचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा चिडलेल्या ग्राहकांशी होणारे संभाषण आणि दिवस /रात्र फोनवरील वार्तालाप हे सारे फारच थकवणारे असते. तसेच कामाच्या  कक्षाही मर्यादित असल्याने, कालांतराने कामातील एकसुरीपणाचा कंटाळा येऊ शकतो.
या क्षेत्रात कर्मचाऱ्यांची घट होण्याचे प्रमाण कर्मचाऱ्यांच्या मधल्या फळीत तुलनेने कमी आहे. बीपीओ क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत अनुभवी कर्मचाऱ्यांनी लक्षणीय प्रगती केल्याचे स्पष्ट दिसून येते. याचे बरेचसे श्रेय कंपन्यांच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नांना जाते.
आता बीपीओ उद्योग, उच्च मूल्यवíधत उपक्रमांतून म्हणजे फीचर रिच आणि नॉन व्हॉइस ट्रान्झ्ॉक्शनमध्ये शिरकाव करीत आहे, उदा. इन्व्हॉइस प्रोसेसिंग, इक्विटी रिसर्च वगरे. साहजिकच भविष्यात या उद्योगातील करिअर संधींमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होईल, हे निश्चित. यांसारखे करिअरच्या प्रगतीचे इतर आकर्षक पर्यायही अलीकडे उपलब्ध होत आहेत. उदा. नॉलेज प्रोसेस आउटसोìसग(केपीओ).
या प्रकारात लीगल प्रोसेस आउटसोìसग, हाय टेक डीस्क्रीट मॅन्युफॅक्चिरग, रिटेल एनर्जी, युटिलिटीज अ‍ॅण्ड रिसोर्स प्लािनग फॉर ग्लोबल कॉर्पोरेशन अशा विविध क्षेत्रांतील कामांसाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचे विश्लेषण आणि अन्य संलग्न कामे ‘बीपीओ’मधील कुशल कर्मचाऱ्यांकडून करून घेणे अपेक्षित आहे.
दीर्घकालीन प्रगती आणि बीपीओ
बीपीओ क्षेत्रातील नोकरदाराने सुरुवातीला निदान तीन ते चार वष्रे तरी एकाच कंपनीत टिकून राहणे गरजेचे आहे. तरच या उद्योगातील बारकावे आणि सखोल ज्ञान मिळवणे त्यांना शक्य होईल. कर्मचारी गळतीला आळा घालण्यासाठी सध्या या उद्योगात नावीन्यपूर्ण धोरणे राबविण्यात येत आहेत.
कर्मचाऱ्यांची धरसोडवृत्ती कमी करण्यासाठी अलीकडे कंपन्यांनी उचललेले पहिले पाऊल म्हणजे नोकरीत टिकून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर बढतीच्या संधी देऊन प्रोत्साहन देणे.
इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच बीपीओ उद्योगातही कर्मचाऱ्यांचे हित जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘व्हॉइस बेस्ड ट्रान्झ्ॉक्शन प्रोसेसिंग’मध्ये आर्थिक सेवांपासून ते दूरसंचार अशा बहुविध शाखांची माहिती मिळवण्यास पुष्कळ वाव असतो.
‘बीपीओ’त काम करणाऱ्या व्यक्तींना शिक्षणासाठी अनेक प्रकारे उद्युक्त केले जाते. पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, अभ्यासासाठी पुरेशी रजा दिली जाते. अंगभूत कौशल्ये जोपासण्यासाठी आणि नवीन आत्मसात करण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. बीपीओ उद्योगात यशस्वी होण्यासाठी ग्राहकांशी- प्रामुख्याने विदेशी ग्राहकांशी अधिक परिणामकारकरीत्या संपर्क साधण्याच्या दृष्टीने संवाद कौशल्याचे रीतसर शिक्षण वेगवेगळ्या शिक्षणक्रमांद्वारे दिले जाते.
बीपीओ कंपन्यांमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला कामे वाटून दिलेली असतात. साहजिकच प्रत्येकाला स्वत:च्या कामासाठी आवश्यक असणारी नपुण्ये अवगत असतातच, पण इतर कामांसाठी लागणाऱ्या गोष्टी शिकून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनीही स्वेच्छेने योग्य प्रशिक्षण घेऊन स्वत:ची अर्हता वाढवणे आणि वरचेवर होणारा कामातील बदल स्वीकारणे जरुरी असते. या क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी स्वयंप्रेरित असणे गरजेचे आहे. नव्या गोष्टी शिकण्याची आणि मेहनत करण्याची मनापासून तयारी असेल तर बीपीओ क्षेत्रात करिअरच्या नवनव्या संधी सहज मिळू शकतात. बीपीओ कंपन्या पदवीधर युवावर्गाला कामाची संधी देतात आणि त्याचबरोबर या उद्योगातील इतर गोष्टींचे प्रशिक्षणही देतात. वेगवेगळ्या पदव्या घेऊन जितकी होईल त्यापेक्षा जास्त प्रगती या क्षेत्रातील कामाच्या प्रत्यक्षदर्शी अनुभवातून आणि मिळणाऱ्या नित्यनवीन माहितीतून साध्य होते.                         
बीपीओ उद्योगात कर्मचाऱ्यांच्या प्रगतीचा वारंवार आढावा
घेतला जातो. दर सहा किंवा तीन महिन्यांनी, उमेदवाराच्या क्षमतेनुसार कामे वाटून दिली जातात. तर काहींना नवीन प्रशिक्षण कार्यक्रमांना पाठवले जाते. बीपीओ कंपन्यांमधून दरवर्षी अंदाजे २५ टक्के कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी मिळतात. हे सहज शक्य आहे,
कारण या क्षेत्रातील वार्षकि उलाढाल सरासरी शंभर टक्क्यांनी वाढते आहे. अर्थातच प्रत्येकाने केलेल्या कामगिरीनुसार पगारवाढ किंवा
बढती दिली जाते, ही गोष्ट वेगळी.
एखाद्या विषयातील विशेष ज्ञान असणे ही केपीओ क्षेत्राची वाढती गरज आहे. याचे कारण नॉलेज प्रोसेस आऊटसोìसग या क्षेत्राचे स्वरूप ‘बीपीओ’पेक्षा अधिक क्लिष्ट असल्याने या क्षेत्रात अधिक महत्त्वाकांक्षी व्यक्तींची आवश्यकता असते. ‘केपीओ’ज मध्ये नेतृत्वक्षम कर्मचाऱ्यांची गरज असते. अनेक बीपीओ कंपन्यांमध्ये सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी ‘लीडरशिप अ‍ॅडव्हान्समेन्ट प्रोग्राम’ हाती घेतला जातो. या अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांमधून संभाव्य नेतृत्व घडविण्यासाठी उपक्रम राबविले जातात. नेतृत्वाची जबाबदारी पेलता यावी, यासाठी विशेष प्रयत्न घेऊन कर्मचाऱ्यांची जडणघडण करावी लागते. ‘केपीओ’ज मध्ये काम करण्यासाठी संबंधित विषयातील निपुण उमेदवारांची गरज असते. तांत्रिक बाबी हाताळणे अथवा व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या उचलणे, यापकी कोणताही एक मार्ग निवडून प्रगतिपथावर राहता येते.  
‘केपीओ’ज मध्ये काम करण्यासाठी क्रियात्मक आणि व्यवस्थापकीय कौशल्यांव्यतिरिक्त परिणामकारक जनसंपर्क, संवादकुशलता, संवेदनशीलता ,शिस्तबद्धता हे गुणही अंगी बाणवणे आवश्यक असते. नजीकच्या भविष्यात युवावर्गाने ‘बीपीओ’मधील करिअरवर अवलंबून राहणे खरोखरच फायद्याचे ठरेल, यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे या क्षेत्रात मिळणारे लठ्ठ वेतन.
नवनवी सेवा क्षेत्रेही आता आउटसोìसग विभागामध्ये अंतर्भूत होत आहेत. (उदा. इन्शुरन्स अंडर राइटिंग, टेलिमेडिसीन, कन्सल्टन्सी वगरे) त्यामुळे अर्थातच या क्षेत्रातील नोकरीच्या संधींमध्येही वाढ होत आहे. सध्या बीपीओ क्षेत्रात चार लाख १६ हजार भारतीय कर्मचारी कार्यरत  आहेत.
२०१० साली माहिती तंत्रज्ञान व बीपीओ उद्योगांद्वारे २० लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या. या क्षेत्रात होत असलेली कर्मचारी गळती रोखण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या सोयी व सुविधा पुरवल्या जातात. त्या पुढीलप्रमाणे आहेत –
स्टॉक ऑप्शन्स – ‘केपीओ’जमधील उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांमध्ये  (डॉक्टर, वकील, सी.ए., एम.बी.ए) ESOP (एम्प्लॉइ स्टॉक ओनरशिप प्लान) हा इन्सेनटिव्ह्सचा प्रकार लोकप्रिय होत आहे.
कामगिरीच्या प्रमाणात बोनस – सर्वस्वी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून असा हा इन्सेनटिव्ह्स, स्टॉक ऑप्शनच्या स्वरूपात किंवा पशांच्या रूपातही देण्यात येतो.
डेफर्ड बोनस – या प्रकारात परफॉर्मन्स बोनसव्यतिरिक्त काही ठराविक रक्कम कर्मचाऱ्याच्या नावे दोन ते चार वर्षांसाठी गुंतवली जाते आणि मुदतपूर्तीनंतर दिली जाते.
वाहतूक सुविधा – कर्मचाऱ्यांना घरपोच नेण्या-आणण्यासाठी वाहतूक सुविधा बीपीओ कंपन्यांकरवी पुरवली जाते.
शॉिपग डिस्काउन्टस (खरेदीवर सवलती) – बीपीओ कर्मचाऱ्यांसाठी काही खास दुकानांतून ब्रॅण्डेड (नामांकित कंपन्यांच्या) वस्तूंच्या खरेदीवर सवलत दिली जाते.
रेफरल बोनस – एखाद्या नवीन उमेदवाराचे नाव सुचवून किंवा त्याला कंपनीच्या सेवेत आणूनही कंपनीकडून बक्षिसाची भरघोस रक्कम पदरात पाडून घेता येते.
कल्याणकारी सुविधा – याअंतर्गत २४ तास खानपान सेवा, व्यायामशाळांची उपलब्धता, विशेष विचारांती बनवलेल्या आíथक मदतीच्या व कर्ज योजनांचा समावेश होतो.
आरोग्य सेवा – वैद्यकीय मदत, कर्मचाऱ्याचे पालक, पत्नी/ पती व मुले यांच्यासाठी आरोग्य विमा योजना
मित्र-मत्रिणींनो, भरपूर काम आणि भरपूर आर्थिक प्राप्ती अशा दोन्ही गोष्टींसाठी बीपीओ’जमधील करिअर निवडायला काय हरकत आहे? देशाला मोठय़ा प्रमाणात भेडसावणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारीच्या समस्येवर कदाचित हा एक उत्तम तोडगा ठरू शकेल, असे नाही वाटत का तुम्हाला?
 अनुवाद – गीता सोनी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 1:27 am

Web Title: b p o do progress in short time
Next Stories
1 एमपीएससी : सीसॅटची तयारी कशी कराल?
2 फील गुड : स्वप्नांचा ध्यास
3 स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात : एमपीएससी : पेपर-१ सामान्य विज्ञान
Just Now!
X