News Flash

BHEL Recruitment 2021: अभियंता आणि पर्यवेक्षक या पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या अधिक माहिती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी. अर्ज २४ सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी पाठवले जाऊ शकतात.

BHEL Recruitment 2021
नोकरीची संधी (प्रातिनिधिक फोटो)

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अर्थात Bharat Heavy Electricals Limited मध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी नोकरीची बातमी. भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने अभियंता (सिव्हील) आणि पर्यवेक्षक (BHEL) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूज वीक ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने दिलेल्या जाहिरातीनुसार, सिव्हिल इंजिनीअरिंग ट्रेडमध्ये पूर्णपणे निश्चित मुदतीच्या नियुक्तीसाठी अभियंता आणि पर्यवेक्षकांच्या एकूण २२ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज २४ सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी पाठवले जाऊ शकतात. तथापि, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर २०२१ आहे.

असा करा अर्ज

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अभियंता आणि पर्यवेक्षक पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी कंपनीच्या भरती पोर्टल, careers.bhel.in वर दिलेल्या लिंकवरून अर्ज डाउनलोड करणे आवश्यक आहे. हा फॉर्म पूर्ण भराव आणि विनंती केलेल्या कागदपत्रांसह २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर जमा करावा. अर्जासोबतच, उमेदवारांना ऑनलाइन पेमेंटच्या बाबतीत विहित अर्ज फी किंवा पावतीचा डिमांड ड्राफ्ट देखील जोडावा लागेल.

पात्रता निकष जाणून घ्या

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अभियंता आणि पर्यवेक्षक भरती जाहिरात नुसार, फक्त तेच उमेदवार अभियंता (सिव्हिल) च्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केली आहे किंवा इतर उच्च शिक्षण संस्था किमान ६० टक्के गुण. आरक्षित श्रेणींसाठी किमान कट ऑफ ५०%आहे.

त्याचप्रमाणे पर्यवेक्षक (सिव्हिल) पदांसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच, आरक्षित श्रेणींसाठी किमान कट ऑफ ५० टक्के आहे.

याशिवाय, १ सप्टेंबर २०२१ रोजी दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय ३४ वर्षांपेक्षा जास्त नसावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2021 12:35 pm

Web Title: bhel recruitment 2021 apply for 22 engineer and supervisor posts online before 24 september ttg 97
टॅग : Job
Next Stories
1 नोकरीची संधी
2 कृषी घटक सविस्तर अभ्यासक्रम
3 RSMSSB VDO Recruitment 2021: राजस्थानमध्ये ३८०० हून अधिक पदांसाठी भरती! जाणून घ्या अधिक माहिती
Just Now!
X