News Flash

सामान्य अध्ययन पेपर २ कायदे आणि संहिता

भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करताना घटना आणि कायदा हे दोन महत्त्वाचे घटक नुसते महत्त्वाचे नाहीत तर या विषयाच्या अभ्यासाचाच मुख्य पाया आहे.

एमपीएससी मंत्र: रोहिणी शहा   

भारतीय राज्यव्यवस्थेचा अभ्यास करताना घटना आणि कायदा हे दोन महत्त्वाचे घटक नुसते महत्त्वाचे नाहीत तर या विषयाच्या अभ्यासाचाच मुख्य पाया आहे. अभ्यासक्रमामध्ये नमूद करण्यात आलेल्या विविध कायदे व अधिनियमांचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास कसा करावा याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या विभागाचा जवळपास ७० ते ८० % भाग हा पेपर ३ वर overlap होतो. त्यामुळे हा विभाग परफेक्ट तयार केला की पेपर ३ चा जवळपास २५ % भागसुद्धा पक्का होणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा भाग खूप महत्त्वाचा आहे.

कायद्यांमधील काही महत्त्वाच्या घटकांचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे. या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास करायचाच आहे. मात्र एकूणच कायद्यांचा अभ्यास करताना काही मुद्दे सामान्यत: लक्षात घ्यावे लागतील.

सर्व नमूद कायद्यांचा अभ्यास करताना मूळ व अद्ययावत प्रतींचाच वापर करावा.

प्रत्येक कायद्यामधील पुढील बाबींची कलमे समजून घ्यावीत

  • कायद्याची पाश्र्वभूमी
  • महत्त्वाच्या व्याख्या
  • गुन्ह्य़ाचे स्वरूप
  • निकष
  • तक्रारदार (Complainant)
  • अपीलीय प्राधिकारी

असल्यास निर्णय देण्याची / कार्यवाहीची कालमर्यादा

तक्रारी / अपिलासाठीची कालमर्यादा

दंड / शिक्षेची तरतूद

अंमलबजावणीची प्रक्रिया — विहित मुदती

अंमलबजावणी व देखरेखीसाठी संस्था/ समित्या/ परिषदा स्थापन करण्याची तरतूद असलेली कलमे. अशा समित्यांचे कार्यक्षेत्र व असल्यास त्याची आर्थिक मर्यादा असल्यास विशेष न्यायालये

नमूद केलेले अपवाद

या मुद्दय़ांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. तसेच याबाबतच्या चालू घडामोडीही माहीत असायला हव्यात.

माहिती अधिकार अधिनियमातील माहिती आयोग, आयुक्त यांचे कार्य, अधिकार समजून घेतानाच लोकपालविषयक तरतुदीही समजून घेतल्यास फायद्याचे ठरते.

सायबर सुरक्षा कायदा तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम यांच्यातील पारिभाषिक संज्ञा व विशिष्ट व्याख्या समजून घ्याव्यात. त्या आधारे तरतुदी समजून घेतल्यास त्या लक्षात राहणे सोपे होते.

अभ्यासक्रमामध्ये केवळ नागरी हक्क संरक्षण अधिनियम, १९५५चाच उल्लेख असला तरी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ व १९९५ या कायद्यांचा संदर्भ घेणे आवश्यक आहे.

जमीन महसूल संहितेमध्ये उल्लेख करण्यात आलेले मुद्दे बारकाईने अभ्यासावेच, पण शक्यतो संपूर्ण संहिता नजरेखालून घालून महत्त्वाच्या मुद्दय़ांची टिपणे काढता आली तर उत्तम.

समाज कल्याण व सामाजिक विधिविधान

या कायद्यांपैकी सामाजिक विधिविधानाचा भाग पेपर ३ च्या अभ्यासाचाही भाग आहे. या कायद्यांचा अभ्यास करताना भारतीय संविधान, मूलभूत अधिकार, राज्याची नितीनिर्देशक तत्त्वे यांचा संदर्भ लक्षात घेऊन महिला  व बालकांना संरक्षण उपलब्ध करून देणाऱ्या तरतुदी समजून घ्यायला हव्यात. त्याचबरोबर महिला व बालकांचे विशेष अधिकार उदाहरणार्थ समान काम समान वेतन किंवा शिक्षणाचा अधिकार अशा विशेष तरतुदी घटनात्मक अधिकार म्हणून समजून घ्यायला हव्यात. माहिती अधिकार कायदा, २००५ मधील महिलांबाबतच्या तरतुदीही पाहायला हव्यात.

घरगुती हिंसाचार कायद्यातील कलमे व तरतुदी बारीकसारीक तपशिलांसहित पाहायला हव्यात. भारतीय दंड विधानातील महिलांच्या बाबतीतील गुन्ह्य़ांबाबतच्या तरतुदी आणि हुंडाबंदी कायद्यातील तरतुदी वगळणे अनपेक्षित असल्या तरी त्यांचा आढावा घेणे सयुक्तिक ठरेल.

प्रशासनिक कायदे

प्रशासनिक कायदे या घटकामध्ये काही मुद्दे आयोगाने समाविष्ट केले असले तरी प्रशासनिक कायदा असा कुठला एखादा विशिष्ट कायदा नाही हे समजून घ्यायला हवे. प्रशासकीय कामकाजाचे व्यवस्थापन करणारे नियम असा याचा अर्थ घेतला पाहिजे. या दृष्टीने राज्यघटना आणि अन्य कायद्यांच्या अंमलबजावणीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेले अधिकार, जबाबदाऱ्या, कर्तव्ये, कार्यपद्धती, अधिकाऱ्यांना मिळणारे घटनात्मक संरक्षण या बाबींचा समावेश होतो.

विधान मंडळाने केलेले कायदे अमलात आणण्याची (enactment)) जबाबदारी आणि अधिकार प्रशासनातील अधिकाऱ्यांस प्रदान केलेले आहेत, ही बाब सत्ता विभाजन आणि प्रत्यायुक्त कायदे या मुद्दय़ांचा अभ्यास करताना विचारात घ्यावी लागेल.

कायद्याचे राज्य, नैसर्गिक न्यायाचे तत्त्व, प्रशासनिक स्वेच्छानिर्णय या संकल्पना व्यवस्थित समजून घेणे या घटकाच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे.

प्रशासनिक न्यायाधिकरणे, दक्षता आयोग, लोकपाल व लोकायुक्त या संस्थांचा अभ्यास त्यांची रचना, कार्ये, अधिकार, कार्यक्षेत्र, स्थापनेसंबंधीचा कायदा, सध्या अशा संस्थांवरील नियुक्त व्यक्ती या मुद्दय़ांच्या आधारे करावा.

अभ्यासक्रमामध्ये आता उल्लेख नसला तरीही भारतीय पुरावा अधिनियममधील कलम १२३, १२४ व १२५ आणि  भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील प्रकरण २- विशेष न्यायाधीश; प्रकरण ३ – शास्ती व दंडाची तरतूद या बाबी विशेषत्वाने समजून घेणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2021 12:33 am

Web Title: general studies paper 2 laws codes ssh 93
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा 
2 भारताचे संविधान – सामान्य अध्ययन पेपर दोनच्या तयारीचा पाया
3 भारतातील दारिद्र्याची समस्या
Just Now!
X