24 September 2020

News Flash

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटना

सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे काय? त्याचे स्वरूप, उद्दिष्टे याविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.

प्रवीण चौगले

प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये अंतर्भूत आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे काय? त्याचे स्वरूप, उद्दिष्टे याविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल.  आपल्या गरजा, सामूहिक हितसंबंध व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोकांचा गट एकत्र येऊन संघटना बनवतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले हितसंबंध व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रूपामध्ये राष्ट्रे संघटित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांश संघटना १९ व्या शतकामध्ये उदयास आल्या आणि २० व्या शतकामध्ये त्यांचा विकास झालेला दिसून येतो. २१ व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र, राज्ये व अशासकीय घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य  सुकर करण्याचे कार्य पार पाडतात. युद्धे टाळून शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खासगी व सार्वजनिक, वैश्विक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषीकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर-२ साठी संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनईपी, जागतिक आरोग्य संघटना या आणि या प्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपियन संघ, ओईसीडी, ओपेक, ऑपेक, अरब लीग, B. संघटनांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते.

आंतरराष्ट्रीय संघटनांचे अध्ययन करताना त्यांची संरचना, अनिवार्य बाबी (Mandate) B. लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे संयुक्तिक ठरते. बऱ्याचदा परीक्षेमध्ये, आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंधित एखादी बाब चर्चेत असल्यास त्यावर प्रश्न  विचारला गेला आहे. उदा. २०१६ च्या मुख्य परीक्षेमध्ये युनेस्कोशी संबंधित मॅकब्राईड (McBride) आयोगावरचा प्रश्न या पार्श्वभूमीवर पाहता येईल.

या अभ्यास घटकाच्या तयारीविषयी जाणून घेण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घ्यावा. यूपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय संघटना या घटकावर विचारलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्नांचा आपण ऊहापोह करूयात.

What are the key areas of reform if the WTO has to survive in the present context of Trade War, especially keeping in mind the interest of India. (२०१८)

या प्रश्नाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी तसेच याचे उत्तर मिळवण्याकरिता आपल्याला ‘द वीक’ या मासिकाच्या संकेतस्थळावर ८ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या India must lead WTO Reform या शीर्षकाचा लेख आवर्जून वाचावा लागेल. जागतिक व्यापार संघटना नेहमी चर्चेत असते त्यामुळे यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये आतापर्यंत तिच्यावर तीन वेळा प्रश्न विचारला गेला. परिणामी, जागतिक व्यापार संघटनेचे संबंधित पारंपरिक भाग तसेच समकालीन घडामोडी आपणास माहीत असणे आवश्यक आहे. याच संघटनेशी संबंधित २०१४ मध्ये विचारला गेलेला प्रश्न पाहूयात.

WTO is an important international institution where decisions are taken to affect countries inprofound manner. What is the mandate of WTO and how binding are their decisions? Critically analyse Indials stand on the latest round of talks on food security.

असा WTO चा अधिदेश, कार्यपद्धती व हळड शी संबंधित समकालीन घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला. हळड चा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे व मुक्त आणि उदार व्यापारासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे हा आहे. हळड चे निर्णय निरपेक्ष असतात, त्यामुळे निर्णय मान्य न करणाऱ्या देशावर निर्बंध लावले जाऊ शकतात. भारताने अन्नसुरक्षेवरील चर्चेमध्ये व्यापार सुलभीकरण करारा (ळाअ) ला मान्यता देण्यास नकार दिला. भारताने गरीब जनतेला अन्नधान्याची उपलब्धता व्हावी, याकरिता अन्नधान्याच्या सार्वजनिक साठय़ाच्या समस्येवर तोडगा काढावा व पीस क्लॉजला मुदतवाढ देण्याची मागणी केली. अन्नसुरक्षा हा भारतातील कळीचा मुद्दा असल्याने भारताला अन्नधान्याच्या साठय़ामध्ये कपात करण्यास बद्ध करणे ही लोकांच्या अन्नसुरक्षेविषयक अधिकाराशी तडजोड आहे. तसेच, ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहस्रक विकास लक्ष्यामधील गरिबी व भूक नष्ट करणे या तत्त्वाच्या विरोधी असल्याने भारताची मागणी रास्त ठरते. अशा पद्धतीने उत्तराचा समारोप करता येईल.

आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संके तस्थळावरून मिळते. याबरोबरच या संघटनाशी संबंधित समकालीन घडामोडीचा मागोवा घेत राहिल्याने या घटकाची तयारी परिपूर्ण होईल. याकरिता ‘दि इंडियन एक्स्प्रेस’, ‘दि हिंदू’ यांसारखी वृत्तपत्रे व ‘बुलेटिन’ हे मासिक उपयुक्त ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 12:56 am

Web Title: upsc exam preparation tips upsc exam guidance zws 70
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : : भारत आणि जग
2 एमपीएससी मंत्र  : नैसर्गिक व मानवी आपत्ती चालू घडामोडी
3 यूपीएससीची तयारी : भारत आणि महासत्ता
Just Now!
X