11 July 2020

News Flash

आधुनिक भारत

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि भारतीय स्वातंत्र्य यांचा समावेश होतो. 

 

यूपीएससीची तयारी : डॉ. गणेश देविदास शिंदे, श्रीकांत जाधव.

या लेखामध्ये आपण यूपीएससी पूर्व परीक्षेकरिता आधुनिक भारताच्या इतिहासातील (सन १८५८-१९४७) या कालखंडाविषयी चर्चा करणार आहोत.

या घटकावर सन २०११ ते २०१९ मध्ये एकू ण  ५२ प्रश्न विचारले गेले आहेत. पूर्व परीक्षेत आधुनिक भारत — कक (सन १८५८-१९४७) या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात.

सन १८५८-१९४७ हा कालखंड तीन भागांमध्ये विभाजित करता येतो.

 

(१) सन १८५८-१८८५ — यामध्ये भारतीय राष्ट्रवाद व त्याच्या उदयाची कारणे, राणीचा जाहीरनामा, विविध प्रादेशिक राजकीय संघटना, कायदे व विकेंद्रीकरण इत्यादी.

(२) सन १८८५-१९१५ — यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, जहाल—मवाळ कालखंड, बंगालची फाळणी, गव्हर्नर जनरल, क्रांतिकारी चळवळीचा पहिला टप्पा इत्यादी.

(३) सन १९१५-१९४७ — या कालखंडास गांधीयुगअसेही म्हणतात. यामध्ये महात्मा गांधींचे भारतातील आगमन व सत्याग्रह, चळवळी आणि त्यांचा विचारप्रवाह या घटकांचा समावेश होतो.

 

याशिवाय गांधीयुगाला समांतर असलेले इतर प्रवाह यामध्ये क्रांतिकारी चळवळीचा दुसरा टप्पा, कामगार चळवळ, दलित चळवळ, समाजवादी चळवळ, स्वराज्य पक्ष, आझाद हिंद सेना,  महिलांचे योगदान, भारतीय सांप्रदायिकतेचा उदय, मुस्लीम लीग, हिंदू महासभा, भारतीय संस्थाने व तेथील चळवळी, गव्हर्नर जनरल, ब्रिटिश कायदे व घटनात्मक विकास, योजना/ आयोग/ कमिशन, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि भारतीय स्वातंत्र्य यांचा समावेश होतो.

 

गतवर्षीच्या परीक्षेत विचारलेले प्रश्न 

(१) स्वदेशी आंदोलनाविषयी खालील विधाने विचारात घ्या. (२०१९)

(I) या आंदोलनाने देशातील कला व उद्योगातील कारागिरांच्या पुनरुज्जीवनासाठी हातभार लावला.

(II) स्वदेशी चळवळीमध्ये राष्ट्रीय शिक्षण समितीची स्थापना चळवळीचा एक भाग म्हणूनच केली गेली.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(A) केवळ  I (B) केवळ कक

(C)दोन्हीही      (D) दोन्हीही नाहीत

 

(२) खालील जोडय़ा विचारात घ्या. (२०१९)

चळवळ                                                  संस्थापक नेता

(I) ऑल इंडिया अ‍ॅन्टी                     महात्मा गांधी अस्पृश्यता लीग

(II) अखिल भारतीय                       स्वामी सहजानंद किसान सभा     सरस्वती

(III) सेल्फ रिस्पेक्ट  आंदोलन          ई. व्ही. रामास्वामी           नायकर

वरीलपैकी कोणती/ त्या जोडी/ जोडय़ा योग्य आहे/त?

(1) केवळ I

(2) केवळ II

(3) केवळ II आणि III

(D) I, II, JJJ

 

(३) भारतीय स्वातंत्र्य चळवळींविषयी खालील जोडय़ा विचारात घ्या. (२०१९)

व्यक्ती                                           संघटनेतील स्थान

(1) सर तेजबहादूर    शास्त्री                  अध्यक्ष —अखिल    भारतीय लिबरल   फेडरेशन

(2) के . सी. नियोगी                             सदस्य     —संविधान सभा

(3) पी. सी. जोशी                              सरचिटणीस—भारतीय कम्युनिस्ट पार्टी

वरीलपैकी योग्य जोडी ओळखा.

(A) केवळ I

(B) के वळ  I व II

(C) केवळ III

D) I, II, III

 

२०१८ — या वर्षीच्या पेपरमध्ये सन  १९३५ चा भारत सरकार कायदा, हिंद मजूर सभा, स्वराज्य सभा इत्यादींच्या घटनांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.

२०१७ — या वर्षीच्या पेपरमध्ये बटलर समिती,  १९२९ चा ट्रेड डिस्प्युट कायदा,  १८८१ चा फॅक्टरी अ‍ॅक्ट इत्यादी संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.

२०१६ —  या वर्षीच्या पेपरमध्ये मॉन्टेग्यू—चेम्सफोर्ड कायदा किंवा प्रस्ताव, सुरत फू ट, क्रिप्स मिशन, स्वदेशी चळवळ इत्यादी घटनांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.

२०१५ — या वर्षीच्या पेपरमध्ये स्वदेशी चळवळ, आर्थिक शोषण, काँग्रेस—समाजवादी पक्ष,  १९१९चा कायदा, कॅबिनेट मिशन इत्यादी घटनांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते.

 

उपरोक्त प्रश्नांवरून लक्षात येते की, या अभ्यासघटकाच्या अध्ययनाकरिता वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन, व्यक्तिविशेष माहिती, विविध चळवळी आणि त्यांच्याशी संबंधित घडामोडी इत्यादी विषय महत्त्वाचे ठरतात. आधुनिक भारत हा अभ्यासघटक आपणाला पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासावा लागतो.

या घटकाच्या तयारीकरिता

NCERT— आधुनिक भारत : बिपिन चंद्र (Old)

भारताचा स्वतंत्रता संघर्ष — बिपिन चंद्र,

आधुनिक भारताचा इतिहास — बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर,

आधुनिक भारत — सुमित सरकार इ. संदर्भ साहित्य वापरता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:57 am

Web Title: upsc exam study akp 94 19
Next Stories
1 नोकरीची संधी
2 प्रश्नवेध यूपीएससी : भारत आणि जग
3 दुय्यम सेवा पूर्वपरीक्षा नागरिकशास्त्र प्रश्न विश्लेषण
Just Now!
X