SBI Clerk Prelims Result 2022 Out: स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्लर्क प्रीलिम्स २०२२ चे निकाल जाहीर केले आहेत. उमेदवार sbi.co.in किंवा ibps.in. या अधिकृत वेबसाईट्सवर निकाल पाहू शकतात.
क्लर्क विभागातील ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदासाठी १२ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेद्वारे देशभरातील एसबीआयच्या विविध शाखांमध्ये ५,००८ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे.
आणखी वाचा- CBSE 2023 Date Sheet: सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; १२ वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील टप्प्यासाठी निवडले जातील. पुढील टप्प्यात उमेदवारांनी निवडलेल्या स्थानिक भाषेतून परीक्षा घेतली जाईल. ही मुख्य परीक्षा असणार आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
निकाल जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स वापरा
- एसबीआयच्या sbi.co.in. या वेबसाईटवर जा.
- त्यामध्ये करीअर सेक्शनमध्ये जा.
- त्यामधील प्रीलिम्सच्या निकालाची लिंक ओपन करा.
- त्यामध्ये डिटेल्स सबमिट करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर उपलब्ध होईल.