इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आयआयटी मुंबई येथे डिझाइन क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१८ या शैक्षणिक सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

बीडीएस बॅचलर ऑफ डिझाइन- पदवी अभ्यासक्रम – इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मुंबई, गुवाहाटी आणि जबलपूर या केंद्रांवर उपलब्ध असणाऱ्या या पदवी अभ्यासक्रमासाठी अर्जदारांनी बारावीची परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते बारावीची परीक्षेला बसलेले असावेत.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईच्या www.uceed.iitb.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

एमडीएस- मास्टर ऑफ डिझाइन- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या बंगलोर, मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कानपूर, जबलपूर या केंद्रांवर उपलब्ध असणाऱ्या या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अर्जदारांनी डिझाइन विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते त्या पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या www.ceed.iitb.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची निवड परीक्षा घेण्यात येईल. राष्ट्रीय स्तरावरील ही निवड परीक्षा २० जानेवारी २०१८ रोजी घेण्यात येईल. अर्जदारांची संबंधित प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१७ आहे.