महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत उपसंचालक कला (प्रशासन) म्हणून महाराष्ट्र कला संचालनालय म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी, दूरध्वनी क्र. ०२२-२२६७०२१० अथवा ०२२-२२७९५९०० वर संपर्क साधावा अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in किंवा https://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१६.

भारत इलेक्ट्रॉनिक्स, बंगलोर येथे सीनिअर इंजिनीअर (सिव्हिल)च्या २ जागा-

उमदेवारांनी बीई सिव्हिल पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३७ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत इलेक्ट्रॉनिक्सची जाहिरात पाहावी अथवा बीईएलच्या http://www.bel-india.com click on carrers या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१६.

सैन्यदलाच्या वैद्यकीय सेवा विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून संधी-

उमेदवार एमबीबीएस पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ४५ वर्षे. अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या वैद्यकीय सेवा विभागाची जाहिरात पाहावी अथवा http://www.amcsscentry.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर २०१६

गृहमंत्रालयांतर्गत सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेटरीमध्ये संशोधक म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या  https://www.upsc.gov.in अथवा http://www.online.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर २०१६.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई येथे केमिकल इंजिनीअरिंग केमिस्ट्री व इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये विविध प्रकारच्या संशोधनपर संधी-

अर्जदार संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रताधारक, पीएचडी असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ डिसेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा आयआयटी मुंबईच्या http://www.ircc.iitb.ac.in/ IRCC- webpage/md/PDF/ Application.online.pdf  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज असिस्टंट रजिस्ट्रार (आर अ‍ॅण्ड डी ऑफिस) आयआरसीसी विंग, एसजेएमएसओएम बिल्डिंग, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पवई- मुंबई- ४०००७६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१६.

केंद्र सरकारच्या चलन मुद्रणालय, नाशिक रोड येथे कनिष्ठ कार्यालयीन साहाय्यकांच्या १५ जागा-

उमेदवारांनी पदवी परीक्षा कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ ते ९ डिसेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली चलन मुद्रणालय, नाशिक रोडची जाहिरात पाहावी अथवा http://cnpnashik.spmcil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१६.