संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व विकास विभागात संशोधनपर फेलोशिपच्या ४ संधी-

अर्जदारांनी अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व नेट/सेट यासारखी प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी अथवा अभियांत्रिकी वा तंत्रज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १७ ते २३ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली डीआरडीओची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, एडीआरडीई- आग्रा, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, डीआरडीओ, स्टेशन रोड, आग्रा कँट २८२००१ (उत्तर प्रदेश) या पत्त्यावर ७ जानेवारी २०१७पर्यंत पाठवावेत.

दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्तविभाग, पणजी अंतर्गत स्ट्रिंजर्सच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली दूरदर्शन केंद्र, पणजीची जाहिरात पाहावी अथवा संकेतस्थळाला भेट द्यावी. www.ddindia.gov.in संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज साहाय्यक संचालक (वृत्त), प्रमुख- प्रादेशिक वृत्त विभाग, दूरदर्शन केंद्र, आस्तिनो, पणजी-गोवा या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०१७.

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये उप-महाव्यवस्थापक/ मुख्य व्यवस्थापक (कंपनी सचिव) पदावर संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्सच्या  www.rcfltd.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०१७.

कृषी विज्ञान केंद्र, बेळगाव येथे प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर/ सीनिअर सायंटिस्ट म्हणून संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० ते १६ डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली कृषी विज्ञान केंद्र, बेळगावची जाहिरात पाहावी अथवा www.kvk-birds.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार भरलेले अर्ज दि चेअरमन, आयसीएआर कृषी कल्याण केंद्र, बीआयआरडीएस कॅम्पस, तुक्कानही, ता. गोकाक, जि. बेळगाव ५९१२२४ या पत्त्यावर ९ जानेवारी २०१७पर्यंत पाठवावेत.

संरक्षण उत्पादन विभागांतर्गत कंट्रोलर ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स (व्हेईकल) नगर येथे कनिष्ठ कारकून म्हणून खेळाडूंसाठी संधी-

उमदेवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. याशिवाय त्यांनी व्हॉलीबॉल वा टेबल टेनिस यासारख्या क्रीडा प्रकारात विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० डिसेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली कंट्रोलर ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स, अहमदनगरची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कंट्रोलर, कंट्रोलेटर ऑफ क्वालिटी अ‍ॅशुरन्स (व्हेईकल्स), औरंगाबाद रोड, अहमदनगर ४१४००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१७.