सैन्यदलाच्या कमांड हॉस्पिटल, दक्षिण कमांड, पुणे येथे स्टेनोग्राफरसाठी संधी–
अर्जदार बारावी उत्तीर्ण व लघुलेखनाची ८० शब्द प्रति मिनिट तर इंग्रजी ट्रान्सक्रिप्शनची ८० शब्द प्रति मिनिट व हिंदी ट्रान्सक्रिप्शनची ६५ शब्द प्रति मिनिट संगणकीय पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१ ते २७ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण कमांडची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज रजिस्टर्ड टपालाने कमांडंट, कमांड हॉस्पिटल, (दक्षिण कमांड) पुणे ४११०४० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी २०१७.
मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंट केंद्र, बेळगाव येथे आचाऱ्यांच्या ५ जागा–
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांना भारतीय खानपान विषयक ज्ञान आणि कौशल्य असायला हवे. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४ ते २० जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली मराठा लाइट इन्फंट्री, बेळगावची जाहिरात पाहावी. अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४ ते २० जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली मराठा लाइट इन्फंट्री, बेळगावची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि कमांडंट, मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, कॅम्प बेळगाव ५९०००६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१७
इंडिगो एअरलाइन्सतर्फे गोंदिया येते विमानचालक प्रशिक्षण संधी–
अधिक माहिती व तपशिलासाठी इंडिगो एअरलाइन्सच्या http://www.caeoaa.com/nfti-gondia/#.WJrhWNKGPc या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१७.
इंडियन ऑइलच्या पाइपलाइन्स डिव्हिजनमध्ये तांत्रिक शिकाऊ उमेदवारांच्या ६८ जागा–
अर्जदार इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४ ते २० जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑइल पाइप डिव्हिजनची जाहिरात पाहावी. अथवा https://www.iocl.com/PeopleCareers/job.aspx या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ फेब्रुवारी २०१७.
नौदल गोदी– मुंबई येथे फायरमनच्या ६२ जागा–
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, अग्निशमन विषयक प्रशिक्षणप्राप्त व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉमेंट न्यूजच्या ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल गोदी-मुंबईची जाहिरात पाहावी अथवा www.indiannavy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील भरलेले अर्ज अॅडमिरल सुपरिंटेंडंट, नौदल गोदी, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई- ४०००२३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१७.
महाराष्ट्र शासनाच्या मोटार वाहन विभागात साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ‘साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा –
२०१७’ दि. ३०एप्रिल २०१७ आणि पूर्व परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा दि. ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेणार आहे.
(अजा – २४, अज – ७, विजा – ४, भज (क) – ४, भज (ड) – ४, इमाव – ३, विमाप्र – ३, खुला गट – १०६, एकूण १८८)
पात्रता –
ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनीअिरग किंवा समतुल्य (प्रोडक्शन/मशीन टूल्स मेंटेनन्स/फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी/प्लँट इंजिनीअिरग/मेटॅलर्जी) मधील अभियांत्रिकी पदविका/पदवी. पदवी/पदविकेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार पूर्व परीक्षेस बसण्यास पात्र आहेत. मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात गिअर्स असलेली मोटारसायकल, हलके मोटर वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.
शारीरिक अर्हता –
पुरुष – उंची – १६३ सें.मी., छाती – ७९ ते ८४ सें.मी.
महिला – उंची – १५५ सें.मी. वजन – किमान ४५ कि.ग्रॅ. परीविक्षाधीन कालावधी – दोन वष्रे. पूर्व परीक्षा शुल्क – रु. ३७३/- (मागासवर्गीय
रु. २७३/- ऑनलाइन अर्ज) https://mahampsc.mahaonline.gov.in/ या
संकेतस्थळावर दि. १९ फेब्रुवारी २०१७
रात्री २३.५९ वाजेपर्यंत करावेत.