प्रश्नवेध एमपीएससी : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना

या मुद्दय़ावरील चालू घडामोडींबाबत सर्व प्रश्न या सदरामध्ये देण्यात येत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

पूर्व परीक्षेचा महत्त्वाचा घटक म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा अशा मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात येतात. या मुद्दय़ावरील चालू घडामोडींबाबत सर्व प्रश्न या सदरामध्ये देण्यात येत आहेत.

१. पुढील योजना आणि त्यातील तरतुदी यांची कुठली जोडी चुकीची आहे?

१) भारतनेट – सर्व शैक्षणिक संस्थांना मागणीनुसार १०० एमबीपीएस ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे.

२) ग्रामनेट – १० ते १०० एमबीपीएस वेगासह सर्व ग्रामीण विकास संस्थांना जोडणे.

३) नगरनेट – शहरी भागात १ दशलक्ष सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट स्थापन करणे.

४) जन वाय-फाय – ग्रामीण भागात २ दशलक्ष वाय-फाय हॉटस्पॉट स्थापन करणे

२. भगवान महावीर विकलांग सहायता समितीच्या साहाय्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती वर्षांमध्ये जगभरातील विविध देशांमध्ये कृत्रिम अवयव बसविण्यासाठीचे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे नाव काय?

१) दिव्यांग सहायता

२) इंडिया फॉर ह्युमॅनिटी

३) इंडिया अगेन्स्ट डिसॅबिलिटी

४) दिव्यांग उन्नयन

३.  सेंद्रिय शेती – विषमुक्त शेतीच्या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यामध्ये जैविक शेतीसाठी —————- अभियान राबविण्यात येत आहे.

१) बाळासाहेब ठाकरे  शेतकरी सन्मान

२) पंजाबराव देशमुख जैविक शेती

३) दीनदयाळ उपाध्याय कृषी उन्नती

४) अटल कृषी उन्नती

४. शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा एक लाखावरून वाढवून किती करण्यात आली आहे?

१) ३,००,०००

२) २,४०,०००

३) १,७०,०००

४) १,२०,०००

५. राज्यामध्ये मे ते ऑगस्ट २०१८ दरम्यान वनमित्र मोहीम कोणत्या उद्देशाने राबविण्यात आली?

१. वनहक्क दावे व अपीले यांचा कालबद्ध निपटारा करणे.

२. वृक्ष तोडीस आळा घालण्यासाठी ग्रामस्थांचे गट बनविणे.

३. १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणे.

४. वरील सर्व.

६. WAYU  काय आहे?

१) वायुदलासाठीचे मानवरहित विमान.

२) वायुप्रदूषण मोजण्यासाठीची प्रणाली.

३) हवेतील प्रदूषण शोषून घेणारे उपकरण

४) हवामान बदलाच्या अभ्यासासाठीचा उपग्रह

उत्तरे

प्रश्न क्रमांक१. पर्याय क्र.(१)  (भारतनेट – ग्रामपंचायतींसाठी

१ ते १० जीबीपीएस वेग उपलब्ध करून देणे. राष्ट्रीय डिजिटल संप्रेषण धोरणातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सन २०२२ची मुदत ठरविण्यात आली आहे. यातील उपअभियाने व त्यांची उद्दिष्टे प्रश्नामध्ये विचारण्यात आली आहेत.)

प्र.क्र.२. पर्याय क्र.(२) (जयपूर फूट नावाने प्रसिद्ध असलेल्या कृत्रिम अवयवांच्या उत्पादनासाठी भगवान महावीर विकलांग सहायता समिती प्रसिद्ध आहे.)

प्र.क्र. ३. पर्याय क्र.(२) (या मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच शेती मालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे विषमुक्त फळे, भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात या मिशनच्या माध्यमातून बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ व वर्धा या विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.)

प्र.क्र.४. पर्याय क्र.(४) शबरी आदिवासी घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे निकष

पुढीलप्रमाणे :

2   ग्रामीण भागातील घरकुलांसाठी १,२०,००० व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून शौचालये बांधण्यासाठी रु. १२,००० इतके अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे.

2   नक्षलग्रस्त व डोंगराळ भागातील घरकुलांसाठी रु. १,३०,००० इतके अनुदान तारा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून अतिरिक्त रु. १२,००० असे एकूण १,४२,००० असे अनुदान देण्यात येणार आहे.

प्र.क्र.५. पर्याय क्र.(१)

प्र.क्र.६. पर्याय क्र.(३) (WAYU -Wind Augmentation PurifYing Unit  हे उपकरण ५०० वर्गमीटर क्षेत्रातील हवेमध्ये असलेली घन प्रदूषके (पार्टक्यिुलेट मॅटर) शोषून घेण्यास सक्षम आहेत. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद व राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था यांनी हे विकसित केले असून त्याच्या देखभालीचा मासिक खर्च केवळ १५०० रुपये आहे. दिल्लीमध्ये अतिरहदारीच्या भागांमध्ये ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. या उपकरणांच्या प्रदूषके शोषण्याच्या क्षेत्राचा विस्तार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो पूर्ण झाल्यावर देशभरातील महत्त्वाच्या व प्रदूषित शहरांमध्ये त्यांचा वापर सुरू करण्यात येईल.  राज्यातील मुंबई व पुणे ही शहरे सर्वाधिक प्रदूषित आहेत. धोकादायक पातळीची मर्यादा आहे २०० पी. एम., मुंबई आणि पुणे या मर्यादेच्या केवळ ५ पॉइंट्सनी  मागे आहेत. ही बाब विशेष लक्षात घ्यायला हवी.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mpsc exam preparation tips mpsc exam useful tips

ताज्या बातम्या