‘खरी प्रतिभा ही ‘आत्मनियंत्रण’ (Self-), ‘आत्मनिपुणता’ (Self-) व ‘प्रसंगावधान’ (Presenceofmind) यावर अवलंबून आहे,’’ हे रॉबर्ट ग्रीनचे विधान वढरउ पूर्वपरीक्षेतील उरअळ या पेपरला तंतोतंत लागू पडते.

सन २०१३ ते २०२० या काळात तुलनेने सोपा, सरळ व परंपरागत प्रश्न घेऊन येणाऱ्या उरअळ ने सन २०२१ पासून विद्यार्थ्यांना अनपेक्षित असे बदल केले. सन २०२३ च्या पूर्वपरीक्षेतील CSATचा पेपर हा फक्त पात्रतेचा नसून तो विद्यार्थ्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविणारा आहे, अशी टीका या पेपरवर झाली. अत्यंत अवघड असलेल्या सन २०२३ मधील CSAT पेपरमध्ये CAT सारख्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही २०० पैकी ६० गुण मिळवता आले नाहीत. परिणामी GS चे Merit खुल्या प्रवर्गासाठी केवळ ७५.४१ गुण इतके लागले. सन २०२३ च्या CSAT पेपरमुळे विद्यार्थ्यांमध्ये CSAT या विषयाबद्दल कमालीची नकारात्मकता निर्माण झाली होती, परंतु सन २०२४ च्या CSAT पेपरमध्ये यूपीएससीने गतवर्षांची टीकाटिप्पणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना तुलनेने सोपा पेपर दिला.

State board takes one step towards making 10th and 12th exams copy free
दहावी, बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची नजर; कॉपीमुक्त अभियानाच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
mpsc exam latest news in marathi
MPSC Exam : ‘एमपीएससी’ची ४० लाखांत प्रश्नपत्रिका प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
Changes in the format of the NEET question paper
‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात बदल
upsc training center loksatta news
जिल्हास्तरावर यूपीएससी, एमपीएससीचे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार? सुधारणा समितीसमोर…

हेही वाचा >>> मुलाखतीच्या मुलखात : व्यक्तिमत्त्व चाचणीचा अर्ज भरताना…  

विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून स्कॉलरशिप, MTS, NTS अशा परीक्षांची तयारी केली असेल तर त्यांना नक्कीच CSAT सहजगत्या समजून घेता येते. खरं तर अशा परीक्षांमुळे आपली CSAT या विषयाची तयारी शालेय जीवनापासूनच सुरू होते. आकलनक्षमता, तर्क, निर्णयक्षमता अशा गुणांचा विकास जर शालेय जीवनापासून झालेला असेल तर त्याचा फायदा आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच होतो.

CSAT हा पेपर पात्रतेचा पेपर आहे हे आपण ‘यूपीएससीची बाराखडी’ या आपल्या मागील लेखात पाहिले आहे. या लेखात आपण CSAT या पेपरचा अभ्यासक्रम व त्यासाठीचे अभ्याससाहित्य समजून घेणार आहोत.

हेही वाचा >>> नोकरीची संधी

CSAT अभ्यासक्रम :

Comprehension (आकलन)

Interpersonal Skills Including Communication Skills (संवाद कौशल्यांसह परस्पर कौशल्ये)

Logical Reasoning & Analytical Ability (तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता)

Decision Making & Problem Solving (निर्णयक्षमता व समस्या निवारण)

General Mental Ability (सामान्य मानसिक क्षमता)

Basic Numeracy ( Numbers & Their Relation, Orders of Magnitude etc.) (Class X level) (मूलभूत अंकगणित – दहावीच्या स्तरावरील संख्या व त्यांचे संबंध, परिणामांचे क्रमइ.)

Data( Charts, Graphs, Tables, Data Sufficiency etc.) ( Class X level) (विदा व्याख्या – दहावीच्या स्तरावरील चार्टस्, आलेख, तक्ते, विदा पर्याप्तता)

वरील अभ्यासक्रमाचा विचार केल्यास ज्या पद्धतीने यूपीएससीने सन २०२१ पासूनचे बदल CSATमध्ये केले आहेत त्यासाठी तुम्हाला ‘तोतारट्टंट विद्या’ म्हणजेच ‘रट्टा’ अभ्यास कामाला नक्कीच येणार नाही. यासाठी संकल्पनांच्या आधारे (Concept based learning) अभ्यासक्रम समजून घेणे गरजेचे आहे. आपण जर संकल्पना योग्य प्रकारे समजून घेतली तर त्याआधारे आपण प्रश्न अधिक अचूकपणे सोडवू शकतो.

CSAT मधील Comprehension (आकलन) याचे उदाहरण घेतल्यास यूपीएससीने पर्यावरण, आर्थिक धोरण, सामाजिक माध्यमांचा राजकारणावर प्रभाव इ. विषयांचा समावेश सन २०२४ मधील उताऱ्यांमध्ये केल्याचे दिसून येते. यावर विचारलेले प्रश्न हे तथ्यांवर ( Facts) आधारलेले नसून त्यात तर्कसंगत अनुमानावर ( Inference based Questions) आधारित प्रश्न विचारले आहेत. उदा. Which of the following statements best reflect the most logical and rational inferences that can be made from the passage. याचप्रकारे गृहीतक (Assumption based) व केंद्रीय विचार (Central idea) यावर आधारलेले प्रश्न विचारलेले आहेत.

अशाचप्रकारे तर्कावर (Reasoning) आधारित प्रश्नांचा विचार केलास एक भावी प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमचा दृष्टिकोन तपासणे इथे अपेक्षित आहे. उरअळ संबंधी पुढील लेखात आपण आकलन, तर्क व गणित या सर्व घटकांबाबत विस्ताराने जाणून घेणार आहोत.

CSAT संदर्भसाहित्य :

Comprehension (उतारे आकलन)- Trishnal s CSAT Super Course in English Language Comprehension and Reading Comprehension ( Pearson Publication)

यासाठी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका, त्यात विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करून त्याआधारे पुस्तकाचा अभ्यास व्हायला हवा हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

Maths (गणित)– M. Tyra Magical Book on Quicker Maths

Verbal & Non- Verbal Reasoning (तर्क)– A Modern approach to Verbal & Non- Verbal Reasoning by Dr. R. S. Aggarwal

CSAT हा विषय पुस्तके वाचून नाही तर त्यातील संकल्पना समजून घेऊन यूपीएससीने गतवर्षीच्या CSAT पेपरमधील विचारलेल्या प्रश्नांच्या बाबतीत त्या संकल्पनांचा परस्परसंबंध लावून त्याच धारणीच्या इतर प्रश्नांचा सराव केल्याने गुण देतो. त्यामुळे इथे सरावाला खूप महत्त्व आहे. त्यासाठी TestSeries वेळ लावून सोडविणे ही पूर्वअट आहे.

जरी हा विषय पात्रतेचा (२०० पैकी ६६ गुण) असला तरी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सन २०२३ च्या CSAT पेपरने आपल्याला ते चांगल्या प्रकारे शिकविले आहे. यूपीएससीसारखी परीक्षा ही सर्व घटकांना समान न्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच यश बहाल करते हे लक्षात ठेवा! sushilbari10@gmail.com

Story img Loader