ISRO Recruitment 2025: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये.
किती पदे रिक्त आहेत?
इस्रो अंतर्गत येणाऱ्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) SHAR ने 151 पदांसाठी भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तांत्रिक आणि सहाय्यक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. वैज्ञानिक, अभियंता, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ, स्वयंपाकी, अग्निशमन दल, रेडिओग्राफर आणि नर्स यासारख्या विविध पदांसाठी रिक्त जागा आहेत. १०वी, पदवी, नर्सिंग आणि अभियांत्रिकी डिप्लोमा धारक आणि बी.टेक, बी.एससी, एसएसएलसी, बीई किंवा आयटीआय सारख्या शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
पात्रता आणि निवड प्रक्रिया
इस्रोमध्ये या रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, पात्रता समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. किमान वयोमर्यादा १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. शिवाय, राखीव जातींसाठी (SC/ST) 5 वर्षांची आणि OBC साठी ३ वर्षांची वयोमर्यादा सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्यानंतर निवडलेले अंतिम उमेदवार सामील होतील. मूळ वेतन पोस्टानुसार बदलेल, मासिक वेतन १९,७०० ते १ लाख ७७ हाजार असेल.
अर्ज कसा करावा?
- सर्वात आधी apps.shar.gov.in या वेबसाइटवर जावे.
- यानंतर करिअर सेक्शनमधील SDSC SHAR/RMT/01/2025 dated 16.10.2025 View Advertisement वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे आहे. यासाठी आधी रजिस्ट्रेशन करा.
- रजिस्ट्रेन झाल्यानंतर लॉग इन करावे. त्यानंतर सर्व माहिती भरुन फॉर्म अपलोड करा.