सुहास पाटील

१) नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड – २७४ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (जर्नालिस्ट आणि स्पेशालिस्ट्स (स्केल- I)) पदांची भरती.

( I) ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (जर्नालिस्ट) – १३२ पदे (अजा – १८, अज – ७ (२ पदे बॅकलॉगमधील) इमाव – २४, ईडब्ल्यूएस – १३, खुला – ६८) (९ पदे दिव्यांग कॅटेगरी a – १, b – २, c – ३, d & e – ३ साठी राखीव). पात्रता – (दि. १ डिसेंबर २०२३ रोजी) पदवी/ पदव्युत्तर पदवी (कोणतीही शाखा) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण.

( II) अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (स्पेशालिस्ट) – १४२ पदे (अजा – २६, अज – १२, इमाव – ३३, ईडब्ल्यूएस – १४, खुला – ५७) (८ पदे दिव्यांग कॅटेगरी a, b, c, d & e साठी प्रत्येकी २ पदे राखीव). (१) हिंदी राजभाषा ऑफिसर्स – २२ पदे. पात्रता – एम.ए. (हिंदी) पदवी स्तरावर इंग्लिश विषय अभ्यासलेला असावा अथवा इंग्लिश माध्यम असावे. एम.ए. (इंग्लिश) पदवी स्तरावर हिंदी विषय अभ्यासलेला असावा अथवा हिंदी माध्यम असावे. एम.ए. (हिंदी किंवा इंग्रजी भाषा विषय वगळता) पदवी स्तरावर हिंदी/ इंग्लिश विषय अभ्यासलेला असावा किंवा इंग्लिश/ हिंदीपैकी एक माध्यम असावे. (पदवी स्तरावर सरासरी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. (अजा/अजसाठी ५५टक्के गुण)) (२) ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग – २० पदे. पात्रता – बी.ई./बी.टेक./एम.ई./एम.टेक. (कोणत्याही शाखेतील) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – ५५ टक्के गुण) (३) इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी – २० पदे. पात्रता – बी.ई./ बी.टेक./ एम.ई./ एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ MCA) पैकी एका पदवीला किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक. (अजा/ अज – ५५ टक्के गुण) (४) ॲक्च्युरियल – २ पदे. पात्रता – स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिक्स/ अॅक्युरिअल सायन्स किंवा इतर क्वांटिटेटिव्ह डिसिप्लिनमधील पदवी/ पदव्युत्तर पदवी पैकी एका पदवीला किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक. (अजा/ अज – ५५ टक्के गुण) (५) फिनान्स – ३० पदे. पात्रता – बी.कॉम./एम.कॉम. पैकी एका पदवीला किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक. (अजा/ अज – ५५ टक्के गुण) किंवा CAI/ ICWA. (६) लीगल – २० पदे. पात्रता – कायदा विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी पैकी एका पदवीला किमान सरासरी ६० टक्के गुण आवश्यक. (अजा/अज – ५५ टक्के गुण) (७) डॉक्टर्स (एम.बी.बी.एस.) – २८ पदे. पात्रता – एम.बी.बी.एस./ एम.डी./एम.एस. किंवा पीजी – मेडिकल डिग्री किंवा परदेशातील समतूल्य पदवी. उमेदवार नॅशनल मेडिकल कमिशन किंवा स्टेट मेडिकल काऊन्सिलकडे रजिस्टर्ड असावा. वयोमर्यादा – (दि. १ डिसेंबर २०२३ रोजी) २१ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे, विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही – ९ वर्षे)

हेही वाचा >>> UPSC-MPSC : लोकसत्ता टेस्ट सीरिज- ३९

निवड पद्धती – फेज-१ – ऑनलाईन पूर्व परीक्षा (हिंदी ऑफिसर्स पदे वगळता सर्व पदांसाठी) ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट (MCQ) १०० गुणांसाठी, वेळ ६० मिनिटे, (१) इंग्लिश लँग्वेज – ३० गुण, (२) रिझनिंग अॅबिलिटी – ३५ गुण, (३) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ३५ गुण. प्रत्येकी वेळ २० मिनिटे. उमेदवारांना प्रत्येक सेक्शनमध्ये किमान पात्रतेचे गुण मिळविणे आवश्यक. यातून रिक्त पदांच्या १५ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील. फेज-२ – मुख्य परीक्षा – (हिंदी ऑफिसर्स पदे वगळता सर्व पदांसाठी) ऑब्जेक्टिव्ह टाईप ( MCQ) २५० गुणांसाठी वेळ ३ तास आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज ३० गुणांसाठी, वेळ ३० मिनिटे. (निबंध – १० गुण, सारांश लेखन – १० गुण आणि कॉम्प्रिहेन्शन – १० गुण) डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची असेल, जी ऑनलाईन मोडने घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेमधील चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील. मुख्य परीक्षेतील (ऑब्जेक्टिव्ह टाईप) गुणवत्तेनुसार उमेदवार इंटरह्यूकरिता निवडले जातील. इंटरह्यूकरिता उमेदवार निवडण्यासाठी डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमधील गुण मोजले जाणार नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंटरह्यू – इंटरह्यू फक्त निवडक केंद्रांवर घेतले जातील. उमेदवार कंपनीच्या वेबसाईटवरून इंटरह्यूकरिता कॉल लेटर डाऊनलोड करू शकतील. इंटरह्यूच्या वेळी कागदपत्र पडताळणी केली जाईल. इंटरह्यूकरिता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून इंटरह्यूच्या ठिकाणी जाण्या-येण्याचे रेल्वे (स्लीपर क्लासचे)/बसचे भाडे परत केले जाईल. अंतिम निवडीसाठी मुख्य परीक्षेतील ऑब्जेक्टिव्ह टेस्टमधील गुणांना ८०टक्के वेटेज आणि इंटरह्यूमधील गुण २०टक्के वेटेज दिले जाईल. अर्जाचे शुल्क – अजा/अज/दिव्यांग – रु. २५०/- (फक्त इंटिमेशन चार्जेस), इतर उमेदवारांसाठी – रु. १,०००/- (अर्जाचे शुल्क इंटिमेशन चार्जेससह). फेज-१ करिता परीक्षा केंद्र – मुंबई/नवी मुंबई/ठाणे/एमएमआर, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, पणजी इ. फेज-२ करिता परीक्षा केंद्र – मुंबई/नवी मुंबई/ठाणे/एमएमआर. परीक्षापूर्व प्रशिक्षण – अजा/अज/इमाव ( NCL)/दिव्यांग उमेदवारांसाठी अनिवासी परीक्षापूर्व प्रशिक्षण कंपनी आयोजित करणार आहे. उमेदवाराने ऑनलाइन अर्जात तसे नमूद करावे. उमेदवारांना स्वतच्या खर्चाने परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी उपस्थित रहावयाचे आहे.ऑनलाइन अर्ज https://nationalinsurance.nic.co.in/ या संकेतस्थळावर दि. २२ जानेवारी २०२४ पर्यंत करता येतील.