१२ वी उत्तीर्ण पुरुष/महिला अविवाहीत उमेदवारांना डिफेन्समध्ये लेफ्टनंट पदावर भरती होण्याची संधी.

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (यूपीएससी) १ जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या एनडीएच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंग्जमधील १५६ वा कोर्स आणि ११८ वा इंडियन नेव्हल अॅकॅडमी कोर्स ( INAC) साठी दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी ‘नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी अँड नेव्हल अॅकॅडमी एग्झामिनेशन ( II) २०२५’ ही प्रवेश परीक्षा घेणार आहे.

प्रवेश क्षमता – ४०६ पदे. नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी ३७० जागा. (आर्मी – २०८ (महिलांसाठी – १० जागा), नेव्ही – ४२ (महिलांसाठी – ५ जागा) आणि एअरफोर्स – १२० (फ्लाईंग ब्रँचसाठी – ९२ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (टेक्निकल) ब्रँच – १८ जागा (यातील २ जागा महिलांसाठी); ग्राऊंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – १० जागा (यातील २ जागा महिलांसाठी)). नेव्हल अॅकॅडमी (१० अधिक २ कॅडेट एन्ट्री स्कीम) – ३६ जागा (४ जागा महिला उमेदवारांसाठी).

परीक्षा केंद्र – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद, पणजी इ.

पात्रता – ( i) एन्डीए आर्मी विंगसाठी – १२ वी उत्तीर्ण (कोणतीही शाखा), ( ii) एनडीएमधील एअरफोर्स आणि नेव्हल विंग्ज आणि इंडियन नेव्हल अॅकॅडमीमधील १० २ कॅडेट एन्ट्रीसाठी – १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह) उत्तीर्ण.

१२ वीच्या परीक्षेला बसणारे उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत, त्यांना दि. १ जून २०२६ पर्यंत १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी २००७ ते १ जानेवारी २०१० दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड – उंची (पुरुष) एअरफोर्स फ्लाईंग ब्रँचसाठी १६२ सें.मी. (पुरुष/महिला), ग्राऊंड ड्युटी ब्रँचसाठी – १५७ सें.मी.; (१८ वर्षांखालील मुला/मुलींना २ सें.मी. ची सूट मिळू शकते.) उंची – महिला – १५२ सें.मी.; आर्मीतील फ्लाईंग ब्रँचसाठी किमान उंची १६३ सें.मी.; वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात. नेव्हीसाठी पुरुष – उंची – १५७ सें.मी., महिला – उंची – १५२ सें.मी.

दृष्टी – नेव्हीमधील एन्ट्रीसाठी चष्म्याशिवाय ६/१२, ६/१२; चष्म्यासह – ६/६, ६/६. आर्मी एन्ट्रीसाठी दृष्टी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६; चष्म्यासह – ६/६, ६/६. एअरफोर्स विंगसाठी दृष्टी – ग्राऊंड ड्युटी ब्रँचेससाठी चष्म्याशिवाय ६/३६, ६/३६; चष्म्यासह ६/६, ६/६; फ्लाईंग ब्रँचसाठी चष्म्याशिवाय ६/६, ६/९, चष्म्यासह ६/६, ६/६.

इच्छुक उमेदवारांनी शारीरिक तंदुरूस्तीकरिता पुढील सराव ठेवावा. (ए) २.४ कि.मी. अंतर १५ मिनिटांत धावणे, (बी) स्किपिंग, (सी) पुशअप्स आणि सिटअप्स (किमान २० प्रत्येकी), (डी) चिनअप्स किमान ६, (इ) रोप क्लाइंबिंग – ३ ते ४ मीटर.

परीक्षा पद्धती – (ए) लेखी परीक्षा – एकूण ९०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची. पेपर – (१) मॅथेमॅटिक्स कालावधी २ १/२ तास, गुण ३००, पेपर – (२) जनरल अॅबिलिटी टेस्ट कालावधी २ १/२ तास, गुण ६००. पार्ट-ए – इंग्लिश – २०० गुण, पार्ट-बी – जनरल नॉलेज – ४०० गुण. (सेक्शन-ए – फिजिक्स – १०० गुण, सेक्शन-बी – केमिस्ट्री – ६० गुण, सेक्शन-सी – जनरल सायन्स – ४० गुण, सेक्शन-डी – इतिहास, फ्रिडम मूव्हमेंट (सोशल स्टडीज) ८० गुण, सेक्शन-ई – जीओग्राफी – ८० गुण आणि सेक्शन-एफ – करंट इव्हेंट्स – ४० गुण). प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एसएसबी सिलेक्शन सेंटर निवडीसाठी आणि मुलाखतीची तारीख निवडण्यासाठी उमेदवारांनी आर्मीसाठी www. joinindianarmy. nic. in नेव्हीसाठी ६ww. joinindiannavy. gov. in एअरफोर्ससाठी प्रथम पसंती असलेल्या उमेदवारांनी आरइ साठी www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर लॉगइन करा.

(बी) एसएसबी इंटरव्ह्यू – डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान घेतले जातील. (i ्र) स्टेज-१ – ऑफिसर, इंटेलिजन्स रेटींग ( OIR) टेस्ट आणि पिक्चर परसेप्शन अँड डिस्क्रीप्शन टेस्ट ( PP & DT). ( ii) स्टेज-२ – इंटरव्ह्यू, ग्रुप टेस्टींग ऑफिसर टास्क्स, सायकॉलॉजी टेस्ट आणि कॉन्फरन्स या टेस्ट ४ दिवस चालतील. एसएसबी इंटरह्यू एकूण – ९०० गुण.

अर्जाचे शुल्क – रु. १००/- (अजा/अज/महिला/( JCOs/ NCOs/ ORs यांचे मिलिटरी स्कूल/सैनिक स्कूलमध्ये शिकत असणारे पाल्य यांना फी माफ)). ऑनलाइन/इंटरनेट मोडने फी दि. २०२५ (१८.०० वाजे) पर्यंत भरता येईल.

ट्रेनिंग – NDA च्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्ससाठी निवडलेल्या उमेदवारांना ३ वर्षांचे प्रिलिमिनरी ट्रेनिंग एनडीए, पुणे येथे दिले जाईल आणि इंडियन नेव्हल अॅकॅडमीसाठी निवडलेल्या उमेदवारांना इझिमाला, केरळ येथे ४ वर्षांच्या ट्रेनिंगसाठी पाठविले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या (अ) आर्मी कॅडेट्सना बी.एस्सी./बी.एस्सी. (कॉम्प्युटर)/बी.ए.; (ब) नेव्हल कॅडेट्सना बी.टेक्. (डिग्री); (क) एअरफोर्स कॅडेट्सना बी.टेक्./बी.एस्सी./बी.एस्सी. (कॉम्प्युटर) डिग्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून दिल्या जातील.

एनडीएमधून उत्तीर्ण – आर्मी कॅडेट्सना – इंडियन मिलिटरी अॅकॅडमी (आयएमए), डेहराडून येथे (१ वर्षाचे प्रशिक्षण); नेव्हल कॅडेट्सना इंडियन नेव्हल अॅकॅडमी, इझिमाला येथे (१ वर्षाचे ट्रेनिंग) आणि फ्लाईंग ब्रँच एअरफोर्स कॅडेट्सना एअरफोर्स अकॅडमी हैद्राबाद येथे (१ १/२ वर्षाचे ट्रेनिंग दिले जाईल.) एअरफोर्स ग्राऊंड ड्युटी ब्रँच कॅडेट्सना १ वर्षाचे ट्रेनिंग एअरफोर्स टेक्निकल कॉलेज, बेंगलुरू येथे दिले जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱया जेंटलमेन कॅडेट्सना आर्मीमध्ये लेफ्टनंट पदावर, नेव्हल कॅडेट्सना सबलेफ्टनंट पदावर आणि एअरफोर्स कॅडेट्सना फ्लाईंग ऑफिसर पदावर (पे-लेव्हल – १० (५६,१०० – १,७७,५००)) तैनात केले जाईल.

ट्रेनिंग दरम्यान जेंटलमन/महिला कॅडेट्सना रु. ५६,१००/- स्टायपेंड (दरमहा) दिले जाईल. त्यांचे ट्रेनिंग दरम्यान देय असलेल्या भत्त्यांची थकबाकी ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.

शंकासमाधानासाठी UPSC च्या सुविधा केंद्राचा टेलिफोन नं. ०११-२४०४१००१ वर कामाच्या दिवशी सकाळी १०.०० ते १७.३० वाजेपर्यंत संपर्क साधावा. ई-मेल आयडी upscsoap@nic. in

ऑनलाइन अर्ज http:// upsconline. nic. in या संकेतस्थळावर दि. १७ जून २०२५ (२३.५९ वाजे)पर्यंत करावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

suhaspatil237 @gmail. com