Maha RERA Bharti 2023 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Maharashtra Real Estate Regulatory Authority) म्हणजेच महारेरा अंतर्गत वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार, महारेरा फेलोशिप पदाच्या १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ आहे. तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची पद्धत आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – वरिष्ठ कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ कायदेशीर सल्लागार, महारेरा फेलोशिप.
एकूण पद संख्या – १० जागा
शैक्षणिक पात्रता –
- वरिष्ठ कायदेशीर सल्लागार – LLB
- कनिष्ठ कायदेशीर सल्लागार – LLB
- महारेरा फेलोशिप – MBA
नोकरीचे ठिकाण – मुंबई</strong>
अर्जाची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल करण्याचा पत्ता – techoff2@maharera.mahaonline.gov.in
हेही वाचा- मीरा-भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी! आरोग्य विभागातील ‘या’ पदांसाठी भरती सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/
असा करा अर्ज –
- भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ आहे.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1OQN7cU1Pd87oYBHJ_2XQMSjBJxTgKjL6/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.