Maha RERA Bharti 2024 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Maharashtra Real Estate Regulatory Authority) म्हणजेच महारेराच्या अंतर्गत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार विविध रिक्त पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी ऑफलाइनद्वारे अर्ज करावयाचा आहे. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ मार्च असणार आहे.

Maha RERA Bharti 2024 : तर भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्जाची पद्धत, नोकरीचे ठिकाण, पगार यांबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या –

उच्च श्रेणी लघुलेखन- २, लघुटंकलेखक- १, अधीक्षक- २, सहायक अधीक्षक- २, वरिष्ठ लिपीक- ९, अभिलेखापाल- १, इंजिनीयर सहायक- १, कनिष्ठ लिपीक- ४, लिपीक- २, शिपाई- १३ पदे. एकूण ३७ पदांसाठी ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराच्या पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केलेली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
लिंक : https://drive.google.com/file/d/1fsVdfZqmI8aRoZm8oiYuTYXAFspIN399/view

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. व्ही. बी. गांधी रोड, काळा घोडा, फोर्ट, मुंबई- ४००००१.

अधिकृत वेबसाईट – https://maharera.maharashtra.gov.in/

पगार –

उच्च श्रेणी लघुलेखन- ४१,८०० रुपये.
लघु टंकलेखक- ३४,७६० रुपये.
अधीक्षक- ३८,६०० रुपये.
सहायक अधीक्षक- ३४,७६० रुपये.
वरिष्ठ लिपीक- ३४,७६० रुपये.
अभिलेखापाल- ३२,८०० रुपये.
तांत्रिक सहायक- ३५,००० रुपये.
कनिष्ठ लिपीक- ३२,८०० रुपये.
लिपीक- ३२,८०० रुपये.
शिपाई- २५,००० रुपये

हेही वाचा…TIFR मुंबई येथे नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप : उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता, अनुभव, टंकलेखन, संगणक यांबाबतच्या प्रमाणपत्राच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज बाद ठरविण्यात येतील याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. तर, अशा प्रकारे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.