NTPC Recruitment 2024: आजकाल नोकरी शोधण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लोक विविध करिअर गाईडन्स वेबसाइट्स, अ‍ॅप्स आणि ग्रुप्सद्वारे स्वतःसाठी सर्वोत्तम नोकरी शोधत असतात. कॉलेज पासआउट्सनाही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नोकऱ्या मिळतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील जाहिर करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती पार पडतंय. चला तर मग झटपट करा अर्ज आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने भरतीसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

अधिकृत पोर्टलवर सहाय्यक कार्यकारी पदांसाठी अधिसूचना पाठवण्यात आली आहे. भरती अंतर्गत एकूण २२३ रिक्त जागा आहेत, ज्या पुढील निवड प्रक्रियेद्वारे भरल्या जातील. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही अभियांत्रिकी पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. तुम्हालाही एनटीपीसी अंतर्गत या क्षेत्रांमध्ये तुमचे करिअर करायचे असेल, तर ही भरती तुमच्यासाठी सर्वात योग्य पर्याय आहे.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
mumbai metro marathi news, mumbai metro latest marathi news
मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
osho marathi news, osho aashram pune marathi news
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली

अधिसूचनेनुसार, एनटीपीसी सहाय्यक कार्यकारी भरतीसाठी अर्ज २५ जानेवारी २०२४ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असून ८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत इच्छूक उमेदवार अर्ज करु शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ntpc.co.in या साईटवर जावे लागेल. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. ntpc.co.in वर जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत, हे अगोदरच तपासा. या भरती प्रक्रियेसाठी फीस आणि अर्ज हे दोन्ही एकदाच दाखल करावे लागतील. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ८ मार्च २०२४ आहे. त्यापूर्वीच अर्ज करा. खरोखरच केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे.

अधिसूचना – http://www.ntpc.co.in/

NTPC भर्ती 2024 पात्रता निकष

अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी आणि त्यासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान २ वर्षांचा पदव्युत्तर अनुभव असणे आवश्यक आहे.

NTPC भर्ती 2024 वयोमर्यादा

सहाय्यक कार्यकारी पदासाठी NTPC भर्ती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय ३५ वर्ष असणे आवश्यक आहे.

तुम्ही NTPC असिस्टंट एक्झिक्युटिव्ह २०२४ साठी अर्ज कसा कराल?

  • सर्वप्रथम, उमेदवारांनी NTPC इंटरनेट साइट http://www.ntpc.co.in/ वर जा.
  • करिअर पेजमध्ये NTPC रिक्रूटमेंट पर्यायावर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा.
  • नोंदणीकृत ईमेल किंवा फोनवर दिलेल्या पासवर्डसह साइन इन करा आणि पात्रता आणि संबंधित माहिती पहा.
  • त्यानंतर, तुम्हाला विचारलेला सर्व डेटा एंटर करा. नाव, पोस्टचे नाव, शैक्षणिक फाइल्स, पिन कोड, आयडी आणि इतर अनेक आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

हेही वाचा >> बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; बंपर भरतीला सुरूवात, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी

  • शेवटी, श्रेणीनुसार तुमची ऑनलाइन फी क्लिअर केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट करा आणि तुमचा अर्ज प्रिंट करा.