NCRTC Recruitment 2023: आर्किटेक्टमधून पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने चीफ आर्किटेक्ट ते जनरल मॅनेजर/ आर्किटेक्ट अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांची विशेष गोष्ट म्हणजे ४५ वर्षांपर्यंतचे उमेदवार आणि काही पदांसाठी ५५ वर्षांपर्यंतही अर्ज करू शकतात. पदवीसोबतच त्यांना या क्षेत्रात काम करण्याचा चांगला अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झाल्यावर उमेदवारांना मासिक पगार लाखोंमध्ये मिळेल. या रिक्त पदांचा तपशील जाणून घ्या.

अर्ज कसा करायचा

या पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाइनच करता येतील. यासाठी तुम्हाला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. हे करण्यासाठी, NCRTC च्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता आहे – ncrtc.co.in . इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
onion, Nashik, onion auction,
विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
wheat, farmers
केंद्राचा ‘हा’ निर्णय गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर?
tariff hike electricity
राज्यांतील वीज ग्राहकांवर १५ ते ४० टक्के दरवाढ लागू; वीज तज्ञ प्रताप होगाडे यांची माहिती

रिक्त जागा तपशील

  • NCRTC मधील या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
  • चीफ आर्किटेक्ट – १ पद
  • जनरल मॅनेजर / आर्किटेक्ट – १ पद
  • ऍडीशनल जनरल मॅनेजर / आर्किटेक्ट – २ पदे
  • सिनियर डिप्टी मॅनेजर/ आर्किटेक्ट – २ पदे
  • डिप्टी जनरल मॅनेजर/ आर्किटेक्ट – २ पदे

कोण अर्ज करू शकतो

  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे B.Arch पदवी असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या वर्षांचा अनुभवही मागविण्यात आला असून, तो पुढीलप्रमाणे आहे.
  • चीफ आर्किटेक्ट पदासाठी उमेदवाराकडे बी.आर्क असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला सरकारी क्षेत्रात २० वर्षांचा किंवा खाजगी क्षेत्रात २२ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. वयोमर्यादा ५५ वर्षे आहे.
  • जनरल मॅनेजर आर्किटेक्ट पदासाठीही उमेदवार बी.आर्क उत्तीर्ण असावा. यासोबतच सरकारी क्षेत्रातील १७ वर्षांचा अनुभव किंवा खाजगी क्षेत्रातील १९ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. वयोमर्यादा ५० वर्षे आहे.
    इतर पदांसाठी देखील बी.आर्क आवश्यक आहे. यानंतर संबंधित क्षेत्रातील १४ ते ८ वर्षांचा अनुभव मागविण्यात आला आहे.

( हे ही वाचा: तुम्हालाही १ लाखांपेक्षा जास्त पगार हवाय? तर आजच ‘या’ भरतीसाठी अर्ज करा)

तुम्हाला किती पगार मिळेल

या पदांवर निवड केल्यास तुम्हाला चांगला पगार मिळेल. चीफ आर्किटेक्टला १ लाख २० हजार रुपये ते २ लाख ८० हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाऊ शकतो. तसेच सर्व पदांचे पगार लाखात आहेत. तुम्ही सूचना तपशीलवार तपासू शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२३ आहे .