Abhay Daga Success Story In Marathi : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा (सीएसई) उत्तीर्ण होणे सोपे काम नाही. कारण – ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.ही परीक्षा पास होण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे अनेक जण परीक्षा पास न झाल्याच्या दुःखात अनेक जण डॉक्टर इंजिनिअरिंगकडे वळतात. पण, असे अनेक इच्छुक असतात; जे आव्हाने आणि अपयशांना स्वीकारून यशस्वी होऊन स्वतःचे नाव मोठे करतात. तर, आज आपण अशा एका आयपीएस अधिकाऱ्या बद्दल जाणून घेणार आहोत; ज्याने स्टार प्लसच्या लोकप्रिय मालिका ‘सिया के राम’मध्ये काम करून आपला छंद पूर्ण करण्यासाठी अभिनय नक्कीच केला, पण जेव्हा करिअरचा प्रश्न आला तेव्हा त्याने कठोर परिश्रम केले आणि आयएएस अधिकारी बनला.

आयआयटी-खरगपूरचे माजी विद्यार्थी आयपीएस अधिकारी अभय डागा यांनी ऑल इंडिया रँक (AIR) ८३ रँकसह परीक्षा उत्तीर्ण केली. अभय डागा मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत आणि प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र आणि डॉक्टर मीना डागा यांचे पुत्र आहेत. त्यांनी वर्धा येथील बीव्हीबी लॉयड्स, विद्या निकेतन स्कूलमधून शिक्षण घेतले आणि नंतर हैदराबाद येथून इंटरमिजिएट पूर्ण केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनय क्षेत्रात रस निर्माण झाला (Success Story)

यानंतर, अभय यांनी भारतातील सर्वात प्रसिद्ध अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश मिळवला. या काळात त्यांना अभिनय क्षेत्रात रस निर्माण झाला होता. म्हणूनच, त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. तसेच ‘सिया के राम’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतही दिसले होते. पण, २०१८ मध्ये अभय मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाला. पण, २०२१ मध्ये त्याने नोकरी सोडली आणि यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर, अभयने अखेर २०२३ मध्ये एआयआर ८३ सह परीक्षा उत्तीर्ण केली.