Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेतर्फे १० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. उपलब्ध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.thanecity.gov.in या वेबसाइटद्वारे डाउनलोड करून ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठाणे महानगरपालिका भरती मंडळातर्फे मार्च २०२३ च्या जाहिरातीत एकूण २४ रिक्त पदांची घोषणा केली आहे. १२ एप्रिल २०२३ रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह खालील पत्त्यावर मुलाखत पार पडणार आहे.

ठाणे महानगरपालिका भरती २०२३.

  1. पदाचे नाव: परिचर.
  2. रिक्त पदे: 24 पदे.
  3. शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण
  4. नोकरी ठिकाण: ठाणे.
  5. वेतन: २०,००० रुपये दरमहा.
  6. अर्जाची प्रक्रिया: ऑफलाईन.
  7. निवड प्रक्रिया: मुलाखत.
  8. मुलाखतीची तारीख: 12 एप्रिल 2023.

मुलाखतीचा पत्ता: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशाकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी पाचपाखडी, ठाणे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण,
  • शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबधी कामाचा ३ वर्षाचा अनुभव.
  • महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा, DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

हे ही वाचा<< मुंबई महानगरपालिकेत जॉब हवाय? ४०,००० हुन अधिक पगार, कामाचे स्वरूप व अर्जाची पद्धत जाणून घ्या

वयाची अट (Age Limit)

SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सूट, OBC प्रवर्गाला ३ वर्षे सूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जनरल कॅटेगरी (खुला प्रवर्ग) – ३८ वर्षे