RRC Recruitment 2024 : रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC), उत्तर रेल्वेने भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. उत्तर रेल्वेवरील विविध विभाग/युनिट्स/कार्यशाळा येथे प्रशिक्षण देण्यासाठी शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत ४०९६ ॲक्ट अप्रेंटिसकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. पात्र व इच्छुक उमेदवार या भरतीसाठी १६ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क किती, रिक्त पदे व पदसंख्या, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या… RRC Recruitment 2024 : रिक्त पदे व पदसंख्या उत्तर रेल्वे या भरती मोहिमेद्वारे शिकाऊ पदाच्या विविध राज्यांतील एकूण ४,०९५ रिक्त जागा भरणार आहे. RRC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान ५० टक्के गुणांसह १० वी आणि आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. RRC Recruitment 2024 : वयोमर्यदा उमेदवराचे वय १५ ते २४ वर्षांपर्यंत असावे. हेही वाचा…Success Story : वडील अभिनय क्षेत्रात अन् लेकराने निवडला यूपीएससीचा मार्ग; समजून घ्या असा झाला परीक्षा पास होऊन IAS अधिकारी; वाचा प्रवास अर्ज शुल्क : उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर, एससी (SC), एसटी (ST), ईडब्ल्यूएस (EWS), पीडब्ल्यूडी (PwD) आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे. अधिसूचना डाउनलोड करा : शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी १३ ऑगस्ट रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. उमेदवार अधिसूचनेवर क्लिक करू शकतात आणि सर्व माहिती तपासून पाहू शकतात. लिंक : अर्ज कसा करायचा? पायरी १ : रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या (RRC NR) अधिकृत वेबसाइटला भेट द्या. पायरी २ : होमपेजवर दिलेल्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा. पायरी ३ : अर्ज भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. पायरी ४ : अर्ज शुल्क भरा आणि सबमिट करा. पायरी ५ : पुढील प्रक्रियेसाठी अर्जाची प्रिंटआउट कॉपीही घ्या. अशा प्रकारे उमेदवाराने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे.