scorecardresearch

Premium

UPSC-MPSC : भूगोल : वातावरण म्हणजे काय? वातावरणातील थर कोणते?

Layers of Atmosphere : या लेखातून आपण वातावरण म्हणजे काय? आणि वातावरणातील थरांबाबत जाणून घेऊया.

What is atmosphere, layers of atmosphere,
भूगोल : वातावरण म्हणजे काय? वातावरणातील थर कोणते? ( फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम )

सागर भस्मे

मागील लेखातून आपण अग्निजन्य खडकांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण वातावरण म्हणजे काय? आणि वातावरणातील थरांबाबत जाणून घेऊया. वातावरण म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन, हेलियम इत्यादी विविध प्रकारच्या वायूंचे मिश्रण होय. यात पाण्याची वाफ आणि धुळीच्या कणांचाही समावेश असतो. वातावरण मुख्यतः नायट्रोजन आणि ऑक्सिजन या दोन वायूंपासून बनलेले आहे. ऑर्गन, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन, हेलियम व इतर वायू वातावरणाचा उर्वरित भाग बनवतात. वातावरणाची रचना सामान्यत: तापमान आणि घनता यावर आधारित पाच थरांमध्ये परिभाषित केली जाते.

Global Warming
UPSC-MPSC : जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल म्हणजे नेमके काय? त्याचे परिणाम कोणते?
Salinity of Ocean Water
UPSC-MPSC : महासागराच्या पाण्यातील क्षारता म्हणजे काय? त्याचे स्त्रोत आणि परिणामकारक घटक कोणते?
Drought
UPSC-MPSC : दुष्काळ म्हणजे नेमके काय? त्याची कारणे कोणती?
Diabetes And Travel 11 Tips For Managing Your Blood Sugar Levels On The Go
Diabetes And Travel : मधुमेहींनी प्रवासात कशी घ्यावी स्वत:ची काळजी, जाणून घ्या सोप्या टिप्स

तपांबर (Troposphere)

या थरामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डाय ऑक्साईड, पाण्याची वाफ आणि वातावरणातील विविध वायूंचा समावेश असतो. उंचीनुसार तपांबरामध्ये तापमान कमी होत जाते (प्रत्येक १६५ मीटरला १६ सेल्सिअस) यालाच ‘सर्वसामान्य तापमान घट दर’ असे म्हणतात. तपांबर वातावरणातील सर्वात खालचा थर आहे. विषुववृत्तावर त्याचा विस्तार अधिक उंचीपर्यंत, तर ध्रुवावर त्याचा विस्तार ८ ते १० किमी उंचीपर्यंत आहे. वातावरणातील सर्वात जास्त हवा तपांबरात असून तपांबरामध्ये वहन, अभिसरण आणि उत्सर्जन या तीनही महत्त्वपूर्ण क्रिया घडून येतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अग्निजन्य खडक आणि त्याचे प्रकार

तपस्तब्धी

तपांबर आणि स्थितांबर यांच्यातील वातावरणाच्या थराला तपस्तब्धी थर म्हणतात. या थराची उंची खालच्या थरातील तापमान आणि आवर्तावर अवलंबून असते. खालच्या थरातील तापमान जास्त असेल तर या थराची उंची जास्त असते. या थरामध्ये उष्णतेचे वहन अथवा हवेचे परिवर्तन होत नाही. कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर याची उंची १० ते १५ किमी असून विषुववृत्तावर १८ किमी आणि ध्रुवावर ८ किमी आहे.

स्थितांबर (Stratosphere)

वातावरणात ५० किमी उंचीपर्यंत हा थर आढळतो. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ किंवा धूलिकण नसतात व हवा शुष्क असते. उंचीनुसार या थरातील तापमान वाढत जाते, यालाच तापमानाचे व्युत्क्रमण (Temperature Inversion) म्हणतात. स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तब्धी होय.

ओझोन थर

स्थितांबराच्या खालच्या भागात १० ते ६० किमी उंचीदरम्यान ओझोनचा थर मोठ्या प्रमाणावर आढळतो. ओझोन थर हा सूर्यापासून पृथ्वीवर येणाऱ्या अतिउष्ण, अतिनील किरणांपासून संरक्षण करतो. वातावरणात ओझोनच्या उपस्थितीमुळे हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून प्रभावीपणे संरक्षण केले जाते. ओझोन पट्ट्याची जाडी डॉबसन एककात मोजतात. १९८६ साली अंटार्क्टिकावर ओझोन थराला छिद्र आढळून आले होते. क्लोरोफ्ल्योरो कार्बन या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास झाला आहे.

मध्यांबर (Mesosphere)

मध्यांबर हा थर स्थितांबराच्या वरती ८० किमीपर्यंत आढळतो. या थरामध्ये तपांबराप्रमाणे उंचीनुसार तापमान कमी होत जाते. तापमान कक्षा ० अंश से. ते -६८० अंश सेल्सिअसपर्यंत बदलत जाते. हा वातावरणाचा सर्वात थंड थर समजला जातो.

आयनांबर (Thermosphere)

आयनांबर या थराला थर्मोस्पियर असेही म्हणतात. कारण विषुववृत्ताच्या वरती या थराचे तापमान ८७०° से. पर्यंत असते, तर उत्तर ध्रुवावर तापमान १४२७° से. असू शकते. या थराच्या वरच्या भागात तापमान १००००° से. पर्यंत असते. सौरप्रारणाचा शक्तिशाली जंबुपार भाग या आवरणातील विरळ हवेत शिरल्यामुळे घटकवायूंच्या रेणूंचे अणूत पृथक्करण होते आणि अणूंचे पुन्हा मूलघटकांत विच्छेदन होते. त्यामुळे अगणित धन विद्युत् भारित आयन हे मुक्त इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात या स्तरात परिभ्रमण करीत असतात आणि हे आयन विद्युत भारीत असल्यामुळे यामधून प्रवाहित होणाऱ्या विद्युत लहरींमुळे दूरपर्यंत संदेश पाठविता येतात. म्हणजे जगातील अतिदूरस्थ ठिकाणांशी रेडिओद्वारा संदेशवहन, संपर्क आणि दळणवळण साधणे आयनांबरामुळे शक्य झाले आहे. पृथ्वीकडे येणाऱ्या उल्का या थरामध्ये घर्षणाने जळतात, त्यामुळे येथे राख व धुळीचे ढग निर्माण होतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : युरोप खंडातील पर्वतश्रेणी आणि पठारे

HE-Layer

आयनांबरच्या खालच्या भागात हा थर असून येथून दीर्घ लहरी परावर्तीत केल्या जातात.

ॲप्लेटॉन थर (Appleton Layer)

आयनांबरच्या वरच्या भागात हा थर असून लघु लहरी येथून पृथ्वीकडे परावर्तीत केल्या जातात.

बाह्यंबर (Exosphere)

भूपृष्ठापासून ८०० किमी पलीकडील थराला बाह्यंबर म्हणतात. हा आपल्या वातावरणाचा सर्वात बाह्य स्तर असून आयनांबर वर ९६० किमीपर्यंत विस्तारित आहे. या थरातील तापमान ३००°C ते १६५०°C पर्यंत असते.
या थरामध्ये ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑरगॉन आणि हेलियमसारखे हलके वायू आढळतात. कारण गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने वायूचे रेणू सहजपणे अवकाशात जाऊ शकतात.

हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : अमेरिका खंडातील पर्वतश्रेणी

मॅग्नोटोपॉज (Magnotopouse)

अवकाश आणि पृथ्वीची सीमा यामधील भाग म्हणजे मँग्रोटोपॉज होय. मॅग्नेटोपॉजचे स्थान हे डायनॅमिक ग्रहांच्या चुंबकीय क्षेत्राचा दाब आणि सौर वाऱ्याचा डायनॅमिक दाब यांच्यातील संतुलनाद्वारे निर्धारित केले जाते. मॅग्रोटोपॉज भागात चार्ज पार्टीकल्स आढळतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Upsc mpsc indian geography what is atmosphere and layers of atmosphere mpup spb

First published on: 14-07-2023 at 16:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×