UPSC Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करावा. केंद्रीय लोकसेवा आयोगानं नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. युपीएससीने इकॉनॉमिक ऑफिसर या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. युपीएससी भरती २०२४ मोहिमेद्वारे इकॉनॉमिक ऑफिसरची एकूण ९ पदे भरली जातील. अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार यूपीएससीच्या या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अर्ज करू शकतात.

UPSC Recruitment 2024: शैक्षणिक पात्रता –

मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अर्थशास्त्र किंवा अप्लाइड इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमेट्रिक्समध्ये पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना आर्थिक डेटाचे संकलनात दोन वर्षांचा अनुभव असावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ मार्च २०२४ आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

UPSC Recruitment 2024: वयोमर्यादा –

युपीएससी भरती २०२४ साठी, उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्षे, एससी, एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे आणि अपंगांसाठी १० वर्षांची सूट आहे.

UPSC Recruitment 2024: वेतन

युपीएससी भरती २०२४ साठी, निवडलेल्या उमेदवारांना एक लाखांपेक्षाही अधिक पगार मिळणार आहे.अधिकृत अधिसूचनेनुसार, ही भरती दोन वर्षांसाठी असेल.

हेही वाचा >> Agniveer Recruitment 2024: भारतीय सैन्यात नोकरी करण्याची मोठी संधी; अग्निवीर भरतीसाठी लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

अधिसूचना – https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा आणि मुलाखत देखील द्यावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २८ मार्च २०२४ आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत, उशीरा आलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत.