Indian Army Agniveer Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघा एकच दिवस शिल्लक आहे.अनेकांना भारतीय सैन्यात काम करून देशाची सेवा करायची इच्छा असते. अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरती मेळाव्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशसेवा करू इच्छिणारे यासाठी अर्ज भरू शकतात. भारतीय लष्कर अग्निवीर भरती २०२४ साठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही त्यांना विलंब न करता joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

वेळापत्रकानुसार, भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2024 साठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया १३ फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि २२ मार्च रोजी म्हणजेच आज बंद होणार आहे.

लेखी परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये होणार आहे. जे लेखी परीक्षेत पात्र ठरतील ते शारीरिक चाचणीच्या टप्प्यावर जातील.

वयोमर्यादा – अर्जदार १७ ते २१ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता – अग्निवीर जनरल ड्युटी पदांसाठी, उमेदवारांची किमान इयत्ता १० वी पात्रता असणे आवश्यक आहे, तर ट्रेड्समनच्या भूमिकेसाठी किमान इयत्ता ८वीचे शिक्षण आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाइट – https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय सैन्य भरती २०२४ साठी अर्ज कसा भरावा –

स्टेप १. joinindianarmy.nic.in या भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
स्टेप २. मुख्यपृष्ठावर, ‘ऑनलाइन नोंदणी’ वर क्लिक करा
स्टेप ३. स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज भरा
स्टेप ४. सर्व संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा
स्टेप ५. डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या

हेही वाचा >> नोकरीची संधी:  महिलांसाठी लष्करातली संधी

अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हणतात. अग्निपथ ही भारत सरकारची योजना आहे. ही भरती फक्त चार वर्षांसाठी असते. चार वर्षानंतर ७५ टक्के अग्निवीरांना सैन्यातून मुक्त केले जाते