* पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत. झुरळ, मुंग्या होत नाहीत. शिवाय फुलांचा सुगंध कपाटात भरून राहतो.
* सोन्याचे दागिने छोटय़ा छोटय़ा प्लॅस्टिक पिशवीत घालून नंतर कापडात गुंडाळून ठेवावे म्हणजे झळाळी कायम राहाते.
* कणीक, गूळ व बोरीक पावडर याच्या छोटय़ा छोटय़ा गोळ्या करून झुरळे असतील तेथे ठेवा. ते निघून जातील.
* घरात माशा जास्त झाल्या की, चहाचा चोथा गरम तव्यावर टाका. वासानं माशा जातात.
* कपाटात कॅलेंडरचे जाड कागद घालावेत म्हणजे वस्तूंना गंज लागत नाही.
* भरपूर प्रमाणात लिंबे घेतल्यास लिंबांना खोबरेल तेलाचा हात लावून फ्रिजमध्ये ठेवावीत. महिनाभर चांगली राहतात.
* पेढय़ाच्या रिकाम्या बॉक्समधून लिंबे ठेवावीत. त्यामुळे लिंबे फ्रिजमध्ये वाळत नाहीत.
* बिस्कीटे मऊ होऊ नयेत म्हणून डब्यात मिठाची पुरचुंडी ठेवावी.
* धनेपूड खराब होऊ नये म्हणून त्यात हिंगाचा खडा घालावा.
ल्ल सुनंदा घोलप
sunandaagholap@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2015 रोजी प्रकाशित
करून बघावे असे काही
पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत. झुरळ, मुंग्या होत नाहीत. शिवाय फुलांचा सुगंध कपाटात भरून राहतो.
First published on: 14-02-2015 at 03:04 IST
मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try to do it