‘तुमचं कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का?’ हा स्नेहा खांडेकर यांचा लेख (२४ ऑगस्ट) वाचला. भारत सरकारने २०१३ मध्ये ‘कार्यस्थळी होणारा लैंगिक छळविरोधी कायदा’ ( POSH Act) लागू केला असला तरी आजही नोकरी टिकविण्यासाठी/ बढतीसाठी/ किंवा बदलीसाठी (स्त्री-पुरुष दोन्हीही) एवढं तर करावंच लागतं म्हणत एका प्रकारे राजीखुशीने किंवा विशेष प्रतिकार न करता लैंगिक छळ सहन करताना किंवा बदलत्या काळाला शरण जाण्याच्या आविर्भावात सहकाऱ्यांबरोबर/ वरिष्ठांबरोबर दारू, सिगारेट, शारीरिक/ लैंगिक सलगी/ जवळीक करताना आढळून येणे हा विशेष काहीही मानून न घेणारा सार्वत्रिक अनुभव असावा. त्यामुळे तक्रारी दाखल होत असल्या तरी त्यांचे प्रमाण नगण्य असावे आणि अत्याचार होणार आणि तो अगदी अतिच होईपर्यंत मुकाटपणे सहन करावे लागणार या भावनेचे सरसकटीकरण झाले आहे असे मला वाटते.

या अशा गढूळलेल्या वातावरणात देशपातळीवर विनेश फोगट या लखलखत्या हिऱ्याने लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवला, त्यासाठी वाटेल ती किंमत मोजून आणि वर अत्युच्च पातळीवर अत्युत्कृष्ट कामगिरी करून दाखवून एक उत्तुंग आदर्श समाजासमोर ठेवला आहे, ज्याची कदाचित आपल्याला नितांत गरजच होती. या दुर्गेने ठेवलेला हा आदर्श आपल्याला समाज म्हणून कितपत झेपतो/ पचतो यावरच ब्रिजभूषण सिंहसारख्यांची समाजात सद्दी चालणार की संपणार हे अवलंबून आहे.

Inequality, injustice violence, fear, fearless,
‘भय’भूती: भयशून्य चित्त जेथे
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा काळाच्या पडद्याआड, अनेकांना समृद्ध करणाऱ्या खास माणसाची कारकीर्द कशी होती?
jat panchayat latest marathi news
सामाजिक-आर्थिक समतेचे काय?
India freedom movement book Dethroned Patel Menon and the Integration of Princely India
एकसंध भारत घडताना…
tanishq
नैसर्गिक हिऱ्यांना कृत्रिम पर्याय नाही; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायणन यांची माहिती
womens drum, womens in drum corps,
ढोलपथकातल्या ‘तिची’ दुखरी बाजू…
Dada Bhuse will benefit from internal dispute in Shiv Sena Thackeray group in Malegaon Outer Assembly Constituency
ठाकरे गटातील दुफळीचा दादा भुसेंना आधार

-प्रवीण नेरुरकर, मुंबई</strong>

माहितीपूर्ण लेख

दर शनिवारी येणाऱ्या ‘चतुरंग’ पुरवणीची मी आतुरतेने वाट बघत असते. विषयांचे वैविध्य, माहितीपूर्ण लेख, रंजक माहिती आणि बरेच काही वाचनीय असते. वानगीदाखल उदाहरण द्यायचे असेल तर शनिवार, २४ ऑगस्टची पुरवणी, ‘तुमचे कार्यालयीन ठिकाण सुरक्षित आहे का? हा स्नेहा खांडेकर यांचा लेख. ‘स्वसंरक्षणार्थ’, ‘भयकातर हिरवे हूंकार, ‘रिश्तोंका इल्जाम न दो, ‘मतभेद’, ‘तक्रारींचा उपवास’ हे सर्वच लेख वाचनीय, विचार करायला लावणारे आणि माहितीपूर्ण होते. ‘तक्रारींचा उपवास’ हा लेख मला खूप भावला. आपल्या सतत काही ना काही तक्रारी असतात. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ ही रामदास स्वामींची उक्ती आपण विसरतो. तात्पर्य काय, मी ‘चतुरंग’ पुरवणीची कायमच वाट बघत राहीन.

-मीनल श्रीखंडे

गुन्हेगारांना जबर शिक्षा व्हावी

‘रिक्लेम द नाइट’ या गायत्री लेले यांच्या लेखात (३१ ऑगस्ट) स्त्रियांनी कोलकाता येथे स्त्रियांवरील अत्याचाराविषयी काढलेल्या रात्र मोर्चाबद्दल माहिती होती. स्त्रिया शिकल्या, मोठ्या पदांवर नोकरी करतात, आपल्या कार्यकौशल्याने प्रगती करीत आहेत, पण तरीही होणारे अन्याय, अत्याचार कमी झाले नाहीत. गुन्हेगारांना तातडीने जबर शिक्षा झाली तरच असे प्रकार कमी होतील. स्त्रियांना कोणत्याही शहरात एकटीने सहजपणे फिरताना सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती केव्हा निर्माण होईल?

-अर्चना काळे

आईवडिलांचे दु:खही सारखेच

‘दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!’ हा लेखवाचला. आजकाल दोन मुले असूनही परिस्थिती तीच आहे. मुलांना देशात नोकरीच्या संधी कमी असल्याने मुले परदेशी नोकऱ्यांसाठी प्रयत्नात असतात. दोन्ही मुलगे असले काय किंवा मुलगा मुलगी असले काय, परिस्थिती तशीच राहते. पण जसे लेखात म्हटले आहे तसे मुली हल्ली लग्न करताना शक्यतो आईवडिलांना त्याच सोसायटीमध्ये घर घेतात किंवा त्याच विंगमध्ये घर घेतात. करोनानंतर भावंडे किंवा नातेवाईक जवळपास राहणे पसंत करू लागली आहेत. मदतीच्या हाताचे महत्त्व खूप चांगल्या तऱ्हेने लक्षात घेतले जाऊ लागले आहे. वरिष्ठ परदेश जाणे पसंत करीत नाहीत. तेथील हवा, एकटेपण त्यांना मानवत नाही. पण आईवडिलांसाठी नोकरी- व्यवसायही सोडणे शक्य नसते. जरी मदतनीस ठेवला तरी त्याची विश्वासार्हता मिळणे ही एक कठीण बाब होते. वृद्ध आईवडिलांसाठी सुविधा असलेल्या सोसायटी तयार होऊ लागल्या आहेत, पण मायेचा ओलावा कमी पडणारच आहे. त्यामुळे मुलांचे दु:ख आणि त्याच्या आईवडिलांचे दु:ख थोड्याफार प्रमाणात तसेच आहे.

शाळेत प्रशिक्षणाचा तास हवा

‘स्वसंरक्षणार्थ!’ हा तपस्वी गोंधळी यांचा चतुरंग (२४ ऑगस्ट) मधील लेख महिला संरक्षणासंदर्भात अतिशय महत्त्वाचा! शालेय व महाविद्यालयीन पातळीवर मुलींना गुन्हेगारीपासून संरक्षणविषयक प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. या मुली साहसी होऊन जीवनातील कोणत्याही प्रसंगांना धीटपणे सामोरे जाऊन संकटावर मात करतील. या योजना प्रत्यक्षात याव्यात तेव्हाच अप्रिय घटना टळतील. शाळेत जसा खेळाचा तास असतो तसा आठवड्यातून एकदा तरी या प्रशिक्षणासाठी वेळ असायलाच हवा.

उमा हाडके, वेंदूरूथी, कोचीन

तक्रारींचा उपवास फायदेशीर

२४ ऑगस्टच्या अंकातील संकेत पै यांचा ‘तक्रारींचा उपवास!’ हा लेख वाचला. तक्रार करणे म्हणजे असंतोष किंवा नाराजी व्यक्त करणे. आपण जितक्या वारंवार तक्रार करू तितकी आपण नंतर नकारात्मक विचारांची शक्यता वाढवू. तक्रार करणाऱ्याला असे वाटत असेल की आपल्या समस्येचे निराकरण होत आहे, पण तसे न होता समस्या जटिल होत जातात. तक्रार करणे आणि इतरांवर टीका करणे थांबविण्यात मदत करण्यासाठी आपण गॉसिप आणि नकारात्मक चर्चा टाळायला हव्यात. इतरांबद्दल तक्रार करणे किंवा टीका करणे समाविष्ट असलेल्या संभाषणांमध्ये गुंतणे टाळा. जेव्हा हे विषय उद्भवतात तेव्हा विषय बदला किंवा विनम्रपणे सोडून द्या. शारीरिक उपवास, डिजिटल उपवास हे जसे आपल्यासाठी फायदेशीर आहेत तेवढेच लेखकाने सांगितलेला तक्रारींचा उपवासही खूपच आवश्यक आणि फायदेशीर आहे.

भाग्यश्री रोडे-रानवळकर, पुणे</strong>