हावडा येथील सांतरागाछी पुलावर चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत १४ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर येते आहे. आज संध्याकाळी सहाच्या सुमारास सांतरागाछी येथील रेल्वेच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाली. या घटनेत २ जण ठार तर १४ जण जखमी झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. पश्चिम बंगाल येथील हावडा भागात असलेल्या सांतरागाछी या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे. सांतरागाछी फूटब्रिज चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या रूग्णांना रूग्णालयात दाखल केले जाते आहे. रेल्वेने ०३२२२१०७२ आणि ०३३२६२९५५६१ हे हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. या पादचारी पुलावर खचाखच गर्दी झाली होती. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १ जण ठार तर १४ जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर केली आहे. सांतरागाछी या ठिकाणी झालेल्या या घटनेत चेंगराचेंगरी झाली. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने ही घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

रेल्वे ही देशाची लाइफलाइन आहे, मी या घटनेसाठी रेल्वेला दोष देणार नाही. मात्र चेंगराचेंगरी होईल एवढी गर्दी होती तर ही गर्दी हटवण्याचे काम रेल्वेमार्फत का करण्यात आले नाही असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे.