News Flash

अबब ! स्टाफ मीटिंग सुरु असताना छतावरुन पाच फूट अजगर पडला खाली

अजगराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून थोड्याच वेळात व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत

चीनमध्ये स्टाफ मीटिंग सुरु असताना अचानक छतावरुन पाच फूट अजगर खाली पडल्याने कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरु झाली. एका बँकेच्या कर्मचाऱ्यांची ही मीटिंग सुरु होती. मीटिंगमध्ये अचानक अजगर घुसल्याने कर्मचारी प्रचंड घाबरले. काही कल्पना नसताना अजगर अचानक छतावरुन दोन कर्मचाऱ्यांच्या मधोधम पडला. यानंतर घाबरलेले कर्मचारी जागा मिळेल तेथून पळत सुटले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

या पाच फूट अजगराचं वजन पाच किलो होतं. एबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी चीनच्या इंडस्ट्रीयल अॅण्ड कमर्शिअल बँकेत ही घटना घडली. अजगराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून थोड्याच वेळात व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावलं. त्यांनी अजगराला ताब्यात घेऊन जंगलात सोडलं आहे. एखाद्या पक्षाने अजगराला पकडून इमारतीत आणलं असावं अशी शक्यता बँक कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 2:11 pm

Web Title: a python falls from ceiling during staff meeting in china
Next Stories
1 राजघराण्यात पाळणा हलणार, मेगन होणार आई
2 ‘हा’ व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणतात, ‘मी, गरब्याचा रोजच्या व्यायामात समावेश करेन’
3 अबब ! देवीच्या मंडपासाठी वापरली तब्बल ४ हजार किलो हळद
Just Now!
X