News Flash

‘धर्माच्या आधारावर दुजाभाव केला जाऊ नये हेच आंबेडकरांना अपेक्षित होते’

संविधान दिनानिमित्त राज्यसभेतील चर्चेला अरूण जेटली यांनी शुक्रवारी सुरुवात केली.

अरूण जेटली, arun jaitley
'युपीए सरकारच्या काळात धोरणातील कमतरतेमुळे देशातील महागाई वाढली'

धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीमध्ये सरकारकडून दुजाभाव केला जाऊ नये, असेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली राज्यघटना सांगते, असे केंद्रीय अर्थमंत्री आणि राज्यसभेचे सभागृह नेते अरूण जेटली यांनी शुक्रवारी सांगितले. संविधान दिनानिमित्त राज्यसभेतील चर्चेला अरूण जेटली यांनी शुक्रवारी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांवर आपले विचार मांडले.
ते म्हणाले, आंबेडकरांनी तयार केलेली घटना कोणत्याही धर्माच्या बाजूने किंवा विरोधात नाही. घटनेतील कलम २५ प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे आचरण करण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. यातूनच केवळ धर्माच्या आधारावर व्यक्ती-व्यक्तींमध्ये दुजाभाव केला जाऊ नये, असे त्यांना अपेक्षित होते. स्वातंत्र्याचा आणि जीवनाचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला नाकारला जाऊ शकत नाही. कोणतीही सरकारी संस्था लोकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणीबाणीच्या काळात घटनेतील २१ व्या कलमाची पायमल्ली करण्यात आली होती. ते संपूर्ण दशकच हुकूमशाहीचे होते, असे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र न्यायव्यवस्था हे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचाच भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 12:30 pm

Web Title: ambedkars constitution didnt discriminate on basis of religion
Next Stories
1 ‘आप’च्या पाचव्या आमदाराला दिल्ली पोलिसांकडून अटक
2 मानधनाच्या कारणावरून इतिहास संशोधन समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा?
3 मोदींकडून सोनिया आणि मनमोहन सिंग यांना चहापानाचे निमंत्रण
Just Now!
X