05 August 2020

News Flash

जया यांना राजकारणात आणू नका; अमिताभ यांनी अमरसिंहाना दिलेला सल्ला

अनिल अंबानी यांच्या पार्टीत जया बच्चन आणि अमरसिंह यांच्यात मोठा वाद झाला होता.

Jaya Bachchan : अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याविषयी मला धोक्याचा इशारा दिला होता. जया बच्चन यांचा स्वभाव अस्थिर आहे. भारतीय राजकारणात त्यांच्यासारख्या सातत्त्य नसलेल्या व्यक्तीला संधी देणे चुकीचे ठरू शकते, असा सल्ला अमिताभ यांनी सांगितले होते.

जया बच्चन यांचा स्वभाव अस्थिर असल्यामुळे त्यांना राजकारणात आणू नका, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा बच्चन कुटुंबियांचे एकेकाळचे निकटवर्तीय अमरसिंह यांनी केला. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. अमिताभ यांनी जया बच्चन यांच्याविषयी मला धोक्याचा इशारा दिला होता. जया बच्चन यांचा स्वभाव अस्थिर आहे. भारतीय राजकारणात त्यांच्यासारख्या सातत्त्य नसलेल्या व्यक्तीला संधी देणे चुकीचे ठरू शकते, असा सल्ला अमिताभ यांनी आपल्याला दिल्याचे अमरसिंह यांनी सांगितले. मात्र, मी अमिताभ यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत जया यांना समाजवादी पक्षात प्रवेश मिळवून दिल्याचे अमरसिंह यांनी म्हटले. यानंतर २०१२ मध्ये अनिल अंबानी यांनी आयोजित केलेल्या पार्टीत जया बच्चन आणि अमरसिंह यांच्यात मोठा वाद झाला होता. त्यावेळी अमिताभ यांनी जया यांची बाजू घेतली होती. याच कारणामुळे अमरसिंह आणि अमिताभ यांच्यात वितुष्ट आले होते.
दरम्यान, या मुलाखतीत अमरसिंह यांना अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘पनामा पेपर्स’मध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अजय देवगण यांची नावे आढळून आल्याविषयी विचारण्यात आले असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2016 5:12 pm

Web Title: amitabh bachchan told me to not accept jaya bachchan in samajwadi party says amar singh
Next Stories
1 ‘नीट’प्रकरणी निकालाची प्रतिक्षा कायम, उद्या पुन्हा सुनावणी
2 पाहा: पक्ष्याने धडक दिल्यानंतर दिल्ली- भुवनेश्वर विमानाची अवस्था
3 मोदींची पदवी वेबसाईटवर प्रसिद्ध करा, केजरीवाल यांची दिल्ली विद्यापीठाकडे मागणी
Just Now!
X