News Flash

‘बाबरी मशीद खटल्याचा निकाल ३१ ऑगस्टपूर्वी’

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे या खटल्यात आरोपी आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यासाठीची मुदत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ३ महिन्यांनी वाढवली आणि या खटल्याचा निकाल ३१ ऑगस्टपूर्वी दिला जावा असे सांगितले. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे या खटल्यात आरोपी आहेत.

या खटल्याच्या कार्यवाहीवर योग्य ते नियंत्रण ठेवावे, जेणेकरून या ठरलेल्या कालमर्यादेपलीकडे उशीर होणार नाही, असे  सर्वोच्च न्यायालयाने विशेष न्यायाधीश एस.के. यादव यांना सांगितले. साक्षी नोंदवणे आणि खटल्याच्या कार्यवाहीदरम्यान करण्यात आलेल्या अर्जाची सुनावणी यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आदी सुविधांचा वापर करावा, असे सुचविण्यात आले.

राजकीयदृष्टय़ा संवेदनशील अशा या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला देण्यात आलेली मुदत वाढवावी, असे पत्र विशेष न्यायाधीशांनी पाठवले होते. त्यावर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करताना न्या. आर. एफ. नरिमन  व सूर्य कांत यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:06 am

Web Title: babri case extension to end hearing abn 97
Next Stories
1 करोनाच्या रुग्ण दुपटीच्या वेगात वाढ
2 ‘दुसऱ्यांदा वायुगळती झाल्याच्या बातम्या चुकीच्या’
3 पंतप्रधानांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवावा!
Just Now!
X