News Flash

Coronavirus Live Update : पालघर – रेल्वेतील ४ संशयितांची करोना चाचणी

ब्रिटन, तुर्कस्थान आणि युरोपियन देशांच्या नागरिकांना भारतात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

जगभरात, तसंच देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केंद्र सरकार तसंच राज्यसरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपययोजना करण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालंय, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच देशातील करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Live Blog
15:45 (IST)18 Mar 2020
करोनाचा फटका; शेअर बाजार १७०० अंकांनी कोसळला

जगातील तसंच देशातील शेअर बाजाराला करोनाचा मोठ्या प्रमाणात फटक बसला आहे. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात शेअर बाजाराचा निर्देशांक १७०९.५८ अंकांनी घसरून २८ हजार ६८९.५८ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ४.९८.२५ अंकांची घसरण होऊन तो ८४६८.८० अंकांवर बंद झाला.

15:40 (IST)18 Mar 2020
तेलंगणमध्ये करोनाचे सहा रूग्ण

तेलंगणमध्ये करोनाचे सहा रूग्ण सापडले असल्याची माहिती तेलंगणच्या आरोग्य विभागानं दिली आहे. दरम्यान, या रूग्णांना उपचारासाठी सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून हे सहा जण ब्रिटनवरून भारतात आल्याची माहिती समोर आली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

14:28 (IST)18 Mar 2020
पालघर : रेल्वेतील चार संशयितांची करोना चाचणी

मुंबईकडून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीब रथ या गाडीला पालघर येथे थांबा देऊन गाडीमध्ये असलेल्या चार संशयित करोना रुग्णांना पालघरच्यारेल्वेस्थानकावर उतरवण्यात आलं. त्यांच्या हातावर विलगीकरण करण्याचे छापे असल्याने तिकीट तपासनीस यांनी त्यांना रेल्वेचा वापर करण्यास त्यांना मज्जाव केला. पालघरच्या आरोग्य पथकाकडून तपासणी करून त्यांची मूळ गावी खाजगी वाहनातून रवानगी करण्याचा विचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, डहाणू येथील कॉटेज रुग्णालयातदेखील एका रुग्णाला विलगीकरण वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांचे नमूने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत आहेत.

14:13 (IST)18 Mar 2020
वैष्णोदेवी यात्रेला स्थगिती

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवीची यात्रा आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त जम्मू काश्मीरवरून येणाऱ्या आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या राज्यांतर्गत बससेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

14:13 (IST)18 Mar 2020
वैष्णोदेवी यात्रेला स्थगिती

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वैष्णोदेवीची यात्रा आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त जम्मू काश्मीरवरून येणाऱ्या आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या राज्यांतर्गत बससेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

13:34 (IST)18 Mar 2020
अन्य देशांप्रमाणे पाकिस्तानात बंदी अशक्य : इम्रान खान

काही देशांमधील शहरांमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानात असं करणं अशक्य आहे. पाकिस्तान सध्या कठीण परिस्थितींचा सामना करत आहे. जर आम्ही असं केलं तर आम्ही नागरिकांना करोना पासून वाचवू पण त्यांचे भूकेनं प्राण जातील, असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केलं आहे. पाकिस्तानमध्ये सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

12:17 (IST)18 Mar 2020
लोकसभेत करोनावर चर्चेची मागणी

देशभरात सध्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्य़ा सुरू असलेल्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनात करोनावर चर्चेची मागणी करण्यात आली. तृणमूल काँग्रेसनं चर्चेसाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला.

11:59 (IST)18 Mar 2020
मध्यान्ह भोजन : न्यायालयात सुमोटो याचिका

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुलांना मध्यान्ह भोजन मिळत नाही. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे

11:37 (IST)18 Mar 2020
गोएअरचे कर्मचारी अनपेड लीव्हवर

करोनाचा फटका आता सर्वत्र बसताना दिसत आहे. गोएअरनं आपल्या कर्मचाऱ्यांना अनपेड लीव्हवर जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त एअर इंडियानंदेखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या क्रू अलाव्हंस आणि फ्युअर रिअंबसमेंटमध्ये १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

11:12 (IST)18 Mar 2020
गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करण्यावर विचार - टोपे

गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात उपचार सुरू असणाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. सरकारमधील कर्मचारी ५० टक्के यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याची गरज, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. करोना आजार हा बरा होणारा आजार. ८५० लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी ४२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, असल्याचंही ते म्हणाले. 

11:11 (IST)18 Mar 2020
गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल - टोपे

गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात उपचार सुरू असणाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. सरकारमधील कर्मचारी ५० टक्के यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याची गरज, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. करोना आजार हा बरा होणारा आजार. ८५० लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी ४२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, असल्याचंही ते म्हणाले. 

11:11 (IST)18 Mar 2020
गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल - टोपे

गर्दी कमी न झाल्यास लोकल बंद करावी लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात उपचार सुरू असणाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. सरकारमधील कर्मचारी ५० टक्के यावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसंच वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याची गरज, असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. करोना आजार हा बरा होणारा आजार. ८५० लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी ४२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, असल्याचंही ते म्हणाले. 

10:48 (IST)18 Mar 2020
भाजपा आंदोलनात सहभागी होणार नाही - नड्डा

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपा महिन्याभरात कोणत्याही आंदोलनात सहभागी होणार नाही. सर्व राज्यांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच यासंदर्भातील परिपत्रकही काढण्यात आलं असल्याची माहिती, जे.पी. नड्डा यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

10:05 (IST)18 Mar 2020
सुरेश प्रभू १४ दिवस होम क्वारंटाईन

भाजपाचे नेते खासदार सुरेश प्रभू हे पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत. त्यांनी १० मार्च रोजी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियावरून परतल्यानंतर त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. 

https://platform.twitter.com/widgets.js

09:33 (IST)18 Mar 2020
पुणे : करोनाग्रस्तांची संख्या १८ वर

पुण्यात एका महिलेला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यानंतर पुण्यातील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

09:11 (IST)18 Mar 2020
लष्कराच्या एका जवानालाही करोनाची लागण

भारतीय लष्करामधील एका जवानालाही करोना विषाणू संसर्ग झालेल्याचे समोर आले आहे. सैन्यातील जवानांना या आजाराची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. लेहमध्ये हा जवान तैनात असून तो २५ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत सुट्टीवर होता. या काळातच त्या या विषाणूचा संसर्ग झाला आहे. या जवानाचे वडील इराणहून धार्मिक यात्राकरुन परतले आहेत.

08:48 (IST)18 Mar 2020
भारत सरकारच्या प्रयत्नांचं कौतुक

भारत सरकारने करोनाला थांबवण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाल्याची चिन्हे दिसत आहेत. यावरुनच आता जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेन्क बेकेनडॅम यांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

08:43 (IST)18 Mar 2020
३०० भारतीय विद्यार्थ्यांचे रिपोर्ट आठवड्याअखेरिस

इटलीतील ३०० भारतीय विद्यार्थ्यांच्या नमुन्यांचे रिपोर्ट आठवड्याच्या अखेरिस मिळणार आहेत. भारतीय दुतावासाकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली.

08:18 (IST)18 Mar 2020
परराष्ट्रमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रात्री दिल्ली विमानतळावरील अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्या ठिकाणच्या एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला.

https://platform.twitter.com/widgets.js

08:15 (IST)18 Mar 2020
मुंबईत मृताच्या पत्नी, मुलाला करोनाची लागण

दुबईहून प्रवास करून देशात परतलेल्या ६३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. थेट संपर्कात आल्यामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाची पत्नी आणि मुलगा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. शाह यांनी सांगितले.

https://platform.twitter.com/widgets.js

Next Stories
1 “राजभवनाच्या भिंतींना वाचाळ तोंड आहे हे मलिक यांनी उघड केलं”
2 माजी सरन्यायाधीश गोगोई यांच्या  राज्यसभेवरील नियुक्तीने वादळ
3 समान नागरी संहितेवर संसदेत चर्चा करा!
Just Now!
X