28 September 2020

News Flash

पोर्टल लाँच करत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारचं पहिलं पाऊल

संरक्षण क्षेत्रात अधिक आत्मनिर्भर होण्याची गरज, संरक्षणमंत्र्यांचं मत

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘आत्मनिर्भर आठवड्या’दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘अपॉर्च्युनिटी फॉर मेक इन इंडिया डिफेन्स’चं पोर्टल लाँच केलं. यावेळी आत्मनिर्भर भारतअंतर्गत भारतीय कंपन्यांनी तयार केलेली १५ संरक्षण सामग्रीदेखील लाँच करण्यात आली. यापैकी ४ संरक्षण सामग्रींची निर्मिती ऑर्डनंन्स फॅक्टरी बोर्डनं तर अन्य चार संरक्षण सामग्रींची निर्मिती भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेडनं केली आहे. तर अन्य संरक्षण सामग्रींची निर्मिती हिंदुस्तान एअरॉनॉटिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, माझगाव शिपबिल्डर्स, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडनं केली आहे. इतर कोणत्याही क्षेत्रांपेक्षा संरक्षण क्षेत्रात अधिक आत्मनिर्भर होणं आवश्यक असल्याचं मत राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं.

“कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी संरक्षणाला प्राधान्य असतं. जे देश आपलं संरक्षण करण्यात सक्षम असतात त्यांची जागतिक स्तरावर प्रतिमा अधिक बळकट होते हे आपण जाणतोच,” असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. आपल्या संरक्षणासाठी आवश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी आपण परदेशी सरकार, परदेशातील संरक्षण सामग्री पुरवठादार आणि परदेशातील संरक्षण सामग्रींवर अवलंबून असणं योग्य नाही. हे आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांसाठी अयोग्य असल्याचेही ते म्हणाले.

“जर संरक्षण क्षेत्रातील भारतीय सरकारी कंपन्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी कंपन्यांशी स्पर्धेसाठी उतरायचं असेल तर आपल्याला अपडेट व्हावं लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मॉडर्न टेक्निकचा वापर करायला हवा. यासाठईच सरकारनं ऑर्डनंन्स फॅक्टरी बोर्डाचं कॉर्पोरेटायझेशन केलं आहे,” असं संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

राजनाथ सिंह यांनी लाँच केलेल्या संरक्षण सामग्रीत ऑर्डनंस फॅक्ट्रीद्वारे निर्मिती करण्यात आलेल्या नाग मिसाईल कॅरिअरच्या प्रोटोटाईपचा समावेश आहे. याची निर्मिती डीआरडीएल हैदराबादसोबत करण्यात आली आहे. नाग मिसाईल कॅरिअर तयार झाल्यानंतर भारताला अन्य देशांकडून मिसाईल कॅरिअर खरेदी करण्याची गरज भासणार नाही. तसंच यानंतर २६० कोटी रूपये ते ३ हजार कोटी रूपयांपर्यंतची आयात कमी होणार आहे. याव्यतिरिक्त आर्डनंन्स फॅक्ट्री त्रिचीद्वारे तयार करण्यात आलेली १४.५ एमएम अँटी मटेरियल रायफलदेखील लाँच करण्यात आली. याव्यतिरिक्तच टी ९० टँकसाठी आवश्यक असलेला थर्मल इमेजर, इशापोर रायफल फॅक्ट्रीद्वारे लांब पल्ल्याच्या लक्ष्यावर निशाणा साधण्यासाठई तयार करण्यात आलेली स्नायपर रायफलदेखील लाँच करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 4:11 pm

Web Title: defence minister rajnath singh launches a portal for opportunities for make in india in defence via video conferencing jud 87
Next Stories
1 चीनमध्ये आर्थिक मंदी : स्मार्टफोन विक्रीत तब्बल ३५ टक्क्यांची घसरण
2 जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याला ‘निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार
3 टाटा समूहाला एअर इंडिया विक्री प्रस्तावावर स्वामी भडकले; म्हणाले…
Just Now!
X